TRENDING:

नांदेड हादरलं! वैद्यकीय शिक्षण घेणारी तरुणी हॉस्टेलमध्ये आढळली मृत, राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल

Last Updated:

नांदेड शहरालगतच्या सिडको परिसरात एका बी.एच.एम.एस. (BHMS) च्या विद्यार्थिनीने खासगी हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुजीब शेख, प्रतिनिधी नांदेड: नांदेड शहरालगतच्या सिडको परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बी.एच.एम.एस. (BHMS) द्वितीय वर्षात शिकणाऱ्या एका २५ वर्षीय विद्यार्थिनीने खासगी हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव जीवन घोगरे पाटील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
News18
News18
advertisement

नेमकी घटना काय?

मयत तरुणीचं नाव आकांक्षा गायकवाड असून, ती सिडको येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती. आकांक्षा याच भागातील जीवन घोगरे पाटील यांच्या निवासस्थानी असलेल्या खासगी हॉस्टेलमध्ये राहत होती. शुक्रवारी दुपारी तिने राहत्या खोलीत गळफास घेतल्याचं उघड झालं. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली.

फीसाठी मानसिक छळ केल्याचा आरोप

advertisement

आकांक्षाचे वडील मुंजाजी गायकवाड यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आकांक्षाने गेल्या ८ ते १० महिन्यांपासून हॉस्टेलची फी भरली नव्हती. याच कारणावरून जीवन घोगरे पाटील हे तिला वारंवार मानसिक त्रास देत होते. सततचा तगादा आणि होणाऱ्या छळाला कंटाळूनच तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. या तक्रारीवरून सिडको ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

advertisement

हॉस्टेलच्या परवानगीवर प्रश्नचिन्ह

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्रांक्षाला 14000 रुपये दर, कांदा आणि केळीला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या हॉस्टेलमध्ये ही घटना घडली, तिथे ४० ते ५० मुली वास्तव्यास आहेत. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे या खासगी हॉस्टेलला कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नियमांचे उल्लंघन, सुरक्षेच्या उपायोजनांचा अभाव आणि विद्यार्थिनींची सुरक्षितता यावरून आता प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तूर्तास पोलिसांनी राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास केला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नांदेड हादरलं! वैद्यकीय शिक्षण घेणारी तरुणी हॉस्टेलमध्ये आढळली मृत, राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल