TRENDING:

MHADA Lottery : हक्काचं घर घ्यायची सुवर्णसंधी! पुणेसह ‘या’ शहरात म्हाडाची बंपर सोडत; कोणती कागदपत्रे आवश्यक?वाचा सविस्तर

Last Updated:

MHADA Lottery Documents Required : पुणेसह या शहरात म्हाडाने बंपर लॉटरी जाहीर केली आहे. जर तुम्हाला या घरासाठी अर्ज करायचा असेल, तर जाणून घ्या कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाने अर्थात म्हाडाने राज्यातील सामान्य नागरिकांसाठी मोठी सोडत जाहीर केली आहे. पुणे, पिंपरी, सांगली आणि सोलापूर या चार जिल्ह्यांत मिळून तब्बल 6,168 घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या घरांमध्ये मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
News18
News18
advertisement

कुठे किती घरे?

या सोडतीत पुणे आणि पिंपरी महापालिका हद्दीत प्रत्येकी सुमारे 1,500 घरे मिळणार आहेत, तर पीएमआरडीए क्षेत्रात 1,114 घरे उपलब्ध होणार आहेत. म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

अर्ज प्रक्रिया आणि तारखा

या सोडतीसाठी अर्ज आणि अनामत रक्कम स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, अंतिम मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी 11 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर हरकती आणि दावे नोंदवण्यासाठी 13 नोव्हेंबरपर्यंत वेळ दिला जाईल. त्यानंतर अंतिम यादी 17 नोव्हेंबरला जाहीर होईल आणि 21 नोव्हेंबर रोजी सोडत काढण्यात येईल.

advertisement

किती आणि कोणत्या योजनेतील घरे?

या सोडतीत 1,683 प्रथम प्राधान्य तत्त्वावरील घरे 299 पंतप्रधान आवास योजनेतील घरे आणि उर्वरित सामाजिक आणि सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील घरे उपलब्ध होणार आहेत. गेल्या ऑगस्ट महिन्यातील सोडतीतील विक्री न झालेली तब्बल 1,300 घरे यावेळी पुन्हा समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यात पुण्यातील 531 पिंपरीतील 423 आणि पीएमआरडीएतील 250 घरांचा समावेश आहे.

advertisement

नागरिकांना सुवर्णसंधी

या सोडतीमुळे हजारो नागरिकांना स्वतःचे घर घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विशेषतः परवडणाऱ्या किमतीतील घरे मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी दिलासा ठरणार आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि डिजिलॉकरच्या वापरामुळे गैरव्यवहाराला आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.

म्हाडा अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड – अर्जदाराचे तसेच विवाहित असल्यास पती/पत्नीचे. मोबाईल नंबर आधारला लिंक असणे आवश्यक.

advertisement

पॅन कार्ड – अर्जदार व पती/पत्नी दोघांचे.

रहिवासी प्रमाणपत्र / वास्तव्याचा पुरावा

महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)

उत्पन्नाचा दाखला – अर्जदार किंवा पती/पत्नीपैकी कोणी आयकर भरत असल्यास आयकर रिफंड सर्टिफिकेट.

जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र – आरक्षित प्रवर्गातील अर्जदारांसाठी.

विशेष आरक्षित प्रवर्गासाठी प्रमाणपत्रे ही कलाकार, पत्रकार, राज्य आणि केंद्रीय कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, आमदार, खासदार इत्यादींसाठी. ही प्रमाणपत्रे नमुना स्वरूपात वेबसाईटवर उपलब्ध असून संबंधित प्राधिकरणाकडून सही घेऊन अपलोड करणे बंधनकारक आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MHADA Lottery : हक्काचं घर घ्यायची सुवर्णसंधी! पुणेसह ‘या’ शहरात म्हाडाची बंपर सोडत; कोणती कागदपत्रे आवश्यक?वाचा सविस्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल