सरकारला 162 कोटी रुपयांचा चुना
माहिती अधिकार (RTI) कार्यकर्ते अजय बोस यांना मिळालेल्या माहितीनुसार, या अपात्र लाभार्थ्यांमध्ये 12,431 पुरुष आणि 77,980 महिलांचा समावेश आहे. आरटीआय कार्यकर्ते अजय बोस यांनी या योजनेच्या अंमलबजावणीबद्दल माहिती मागवली होती. तेव्हा त्यांना ही आकडेवारी मिळाली. अपात्र लाभार्थ्यांमुळे महाराष्ट्र सरकारला 162 कोटी रुपयांचा चुना लागला आहे.
advertisement
आरटीआयच्या माहिती अधिकारात धक्कादायक माहिती
दरम्यान, 'लाडकी बहीण' योजना फक्त महिलांसाठी असताना, यामध्ये मोठ्या संख्येने पुरुष लाभार्थी आढळून आले आहेत. बोस यांनी या गैरव्यवहाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या गंभीर गैरव्यवहारानंतर आरटीआय कार्यकर्ते अजय बोस यांनी या सर्व अपात्र लाभार्थ्यांकडून मिळालेली रक्कम वसूल करण्याची आणि त्यांच्यावर तातडीने फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घोटाळ्यामुळे सरकारच्या निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचे दिसून येत आहे.
लाडकी बहिण योजना
लाडकी बहिण या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ठरावीक रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या पैशांचा वापर त्या त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा बचत करण्यासाठी करू शकतात. ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्यावर लक्ष केंद्रित करते. यामुळे त्यांना कुटुंबातील निर्णयांमध्ये अधिक सहभाग घेता येतो आणि त्यांना समाजात अधिक सन्मानाने जगता येतं. पण अनेकांनी याचा गैरफायदा घेतल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.