TRENDING:

सावधान! बळजबरीने धर्मांतर केल्यास होणार 7 वर्षांचा तुरुंगवास, फडणवीस सरकारचा नवा कायदा

Last Updated:

बळजबरीने, फसवणूक करून किंवा आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  राज्यात धर्मांतर विरोधी विधेयकाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. बळजबरी, फसवणूक किंवा आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे. मात्र यावरून नवा राजकीय वाद निर्माण होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
News18
News18
advertisement

राज्यातील बहुप्रतीक्षीत धर्मांतर विरोधी विधेयकात कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. बळजबरीने, फसवणूक करून किंवा आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दोषी आढळल्यास 5 लाख रुपयांपर्यंत दंड आणि 7 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धर्मांतर विरोधी विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे.

advertisement

धर्मांतर विरोधी विधेयकातील मुख्य तरतुदी काय?

  • धमकी, खोटी माहिती किंवा आर्थिक आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणणे गुन्हा मानला जाईल.
  • दोषी आढळल्यास 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल.
  • महिला, अल्पवयीन आणि अनुसूचित जाती-जमातींचं धर्मांतर केल्यास दोषींना अधिक कठोर शिक्षा ठोठावली जाईल.
  • धर्मांतरापूर्वी प्रशासनाला माहिती देणे बंधनकारक असणार आहे.
  • advertisement

  • धर्मांतर घडवून आणणाऱ्या संस्थांवर कारवाई केली जाणार आहे.
  • धर्मांतर झालेल्या व्यक्तीचे कुटुंबीय किंवा संबंधित व्यक्तींना तक्रार दाखल करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. पोलीस धर्मांतराची परिस्थिती आणि कारणांची चौकशी करू शकतात.

वैयक्तिक स्वातंत्र्यावर आघात करण्याचा सरकारचा मनसुबा, विरोधकांचा आरोप

दरम्यान, या विधेयकावरून राजकीय वाद सुरू झाले आहेत. राज्य सरकारचं विधेयक आणि प्रस्तावित कायदा संविधानविरोधी असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. वैयक्तिक स्वातंत्र्यावर आघात करण्याचा सरकारचा मनसुबा असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

advertisement

चुकीची माहिती देऊन धर्मांतर झाल्याचं उघड

राज्यात अनेक ठिकाणी बळजबरीनं आणि चुकीची माहिती देऊन धर्मांतर झाल्याचं उघड झालं होतं. तसंच धर्मांतरामुळे सांस्कृतिक ओळख बदलण्याचीही भीती व्यक्त केली जात होती. इतकंच नव्हे तर राजकीय आणि सामाजिक ध्रुवीकरणाचाही दावा केला जात होता. त्यामुळे धर्मांतर विरोधी कायद्यासाठी आग्रही भूमिका घेण्यात आली होती. राज्य सरकारनंही धर्मांतर विरोधी कायद्यासाठी कटबिद्ध असल्याचं सांगितलं होतं. आता सरकारनं त्या दृष्टीनं पाऊलं टाकायला सुरूवात केल्याचं स्पष्ट होतंय. काही दिवसापूर्वी पुण्यातील भिगवण बाजारपेठेतून तरुणीचे अपहरण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वडील शेतकरी तर आई गृहिणी, संगमनेरच्या धनंजयने मिळवली UPSC मध्ये 529 वी रँक
सर्व पहा

मला आईकडे जायचंय...भिगवण प्रकरणात नवा ट्विस्ट, सुधारगृहात राहिल्यानंतर मुलीची पलटी; इंदापूर कोर्टातून अपडेट

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सावधान! बळजबरीने धर्मांतर केल्यास होणार 7 वर्षांचा तुरुंगवास, फडणवीस सरकारचा नवा कायदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल