TRENDING:

Birth- Death Certificate : जन्म- मृत्यूच्या नोंदी लवकर करा, अन्यथा...; सरकारचा नवा नियम काय सांगतो?

Last Updated:

Birth- Death Certificate Cancellation : जन्म किंवा मृत्यू दाखल्याची एका वर्षात नोंद करण्याची मुभा आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेकदा बोगस जन्म किंवा मृत्यूचे दाखले देत असल्याच्या तक्रारी येत असल्यामुळे तहसीलदारांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
खासगी आणि सरकारी रूग्णालयामध्ये होणार्‍या जन्म- मृत्यूच्या नोंदणीसाठीचा अर्ज महापालिकेच्या जन्म- मृत्यू नोंदणी विभागाकडे ऑनलाइन पाठवला जातो. कागदपत्रांची पडताळणी करून तो २१ दिवसांमध्ये संबंधितांना दाखला दिला जातो. जर, संबंधित कागदपत्रे पूर्ण आण बरोबर असतील तर, समोरच्याला एका दिवसातही दाखला दिला जातो. पण आता या जन्म- मृत्यूच्या दाखल्या संबंधित महत्त्वाची बातमी समोर आहे.
Birth- Death Certificate : जन्म- मृत्यूच्या नोंदी लवकर करा, अन्यथा...; सरकारचा नवा नियम काय सांगतो?
Birth- Death Certificate : जन्म- मृत्यूच्या नोंदी लवकर करा, अन्यथा...; सरकारचा नवा नियम काय सांगतो?
advertisement

खरंतर, जन्म किंवा मृत्यू दाखल्याची एका वर्षात नोंद करण्याची मुभा आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेकदा बोगस जन्म किंवा मृत्यूचे दाखले देत असल्याच्या तक्रारी येत असल्यामुळे तहसीलदारांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बोगस जन्म- मृत्यू दाखल्याच्या तक्रारींमध्ये सतत वाढत होत असल्यामुळे तहसीलदारांपेक्षा कमी दर्जाच्या अधिकार्‍यांनी एक वर्ष विलंबाने दिलेले सर्व जन्म- मृत्यू दाखले किंवा नोंदी रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला आहे.

advertisement

उल्हासनगरमध्ये गोवर-रुबेला लसीकरण मोहिम, ५-१५ वयोगटातील बालकांचे होणार लसीकरण

सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्म- मृत्यू दाखल्याच्या नोंदीचा शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार, तहसीलदार किंवा तालुका दंडाधिकारी यांच्यापेक्षा कमी दर्जाच्या अधिकार्‍यांनी जन्म आणि मृत्यूच्या 1 वर्षानंतर केलेल्या नोंदी, तसेच खोट्या आदेशावर आधारित दिलेली प्रमाणपत्रे रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले आहेत. अशा सर्व प्रमाणपत्रांची यादी जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी यांनी तयार करून तहसीलदारांकडे सुपूर्द करावी.

advertisement

तहसीलदारांनी त्या नोंदी तपासून रद्दबातल करून त्याचा तपशील जिल्हाधिकारी, नोंदणी अधिकारी आणि स्थानिक पोलिस ठाण्यास पाठविणे बंधनकारक आहे. रद्द केलेली मूळ प्रमाणपत्रे संबंधित व्यक्तींनी 7 दिवसांच्या आत तहसील कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे; अन्यथा पोलिस कारवाईद्वारे ती जप्त केली जाणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बोगस जन्म- मृत्यूचा दाखल्याचे वृत्त मोठ्या प्रमाणावर येत होते. अनेकांकडे बोगस दाखले असल्यामुळे त्यांची पुढे प्रमाणपत्रांसाठी कोंडी होण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Birth- Death Certificate : जन्म- मृत्यूच्या नोंदी लवकर करा, अन्यथा...; सरकारचा नवा नियम काय सांगतो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल