TRENDING:

Rajya Sabha: विनोद तावडे, रामदास आठवले यांना भाजपकडून संधी, आणखी दोन नावं कोण?

Last Updated:

Rajya Sabha Election 2026: भारतीय जनता पक्षाने राज्यसभेसाठी चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याला केवळ एक दिवस शिल्लक असताना भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या चार जागांसाठी आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली.
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
advertisement

विनोद तावडे, रामदास आठवले, माया चिंतामण ईवनाते, रामराव वडकुते यांना राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे. भाजपकडून संधी देताना राजकीय अनुभव, पक्षनिष्ठा आणि प्रादेशिक प्रातिनिधित्वाचा विचार केलेला दिसतो.

मायाताई ईवनाते, भाजपचा आदिवासी चेहरा

२००२ - नगरसेवक भाजप

२००७ - महापौर, नागपूर

२०१२ - नगरसेवक, ( भाजप प्रदेश उपाध्यक्ष)

२०१७ - राष्ट्रीय आदिवासी आयोग सदस्य

advertisement

२०२६ - नगरसेवक आणि अग्निशमक सभापती मनपा नागपूर

महाराष्ट्रातून राज्यसभेवर कुणाला संधी द्यावी, याबाबत भाजपच्या केंद्रीय समितीमध्ये दीर्घ चर्चा झाली. चर्चेअंती वरील चार नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राज्यसभेच्या ३७ जागांसाठी महाराष्ट्रासह १० राज्यांमध्ये १६ मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्राच्या सात जागांसाठीची अधिसूचना २६ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आली. नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख ५ मार्च आहे. ३ आणि ४ मार्च रोजी होळीची सुट्टी असल्याने, नामांकन दाखल करण्यासाठी फक्त ५ मार्च शिल्लक आहे.

advertisement

महाराष्ट्रात राज्यसभेच्या सात जागा रिक्त झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातून तीन खासदार आरामात निवडून जाऊ शकतात. १३२ आमदारांचे संख्याबळ भाजपकडे आहे. भाजपने २५ जणांच्या नावांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली होती. त्यापैकी वरील नावांवर सकारात्मक चर्चा होऊन शिक्कामोर्तब झाले.

राज्यसभेची नावे निश्चित करण्याकरिता महत्त्वाच्या बैठका

राज्यसभेची नावे निश्चित करण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपच्या कोअर कमिटीच्या नेत्यांमध्ये तीन बैठका पार पडल्या. या बैठकीत अनेकांच्या नावांवर चर्चा झाली. ही नावे भाजपच्या केंद्रीय समितीकडे पाठवण्यात आली होती.

advertisement

महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचे निश्चित?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
‎वर्दीतला सुरेल आवाज, नोकरी सांभाळून गातात गाणी, अरुण यांचा अनोखा छंद, Video
सर्व पहा

राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार हे इच्छुक आहेत. परंतु शिवसेना पक्षाने या जागेवर आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी शिवसेनेची भूमिका जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत चर्चेअंती शरद पवार यांच्या नावाला शिवसेनेने पाठिंबा दिल्याची माहिती मिळते आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rajya Sabha: विनोद तावडे, रामदास आठवले यांना भाजपकडून संधी, आणखी दोन नावं कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल