TRENDING:

Nagar Parishad Election 2025: नगर परिषदेतही भाजपचा जलवा, आतापर्यंत 100 जागा जिंकल्याचा दावा

Last Updated:

नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट टक्कर सुरू आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तुषार रुपनवार, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

मुंबई: राज्यात नगरपंचायत आणि नगपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक लढवली जात आहे. अर्जभरण्याची मुदत संपल्यानंतर आता प्रचाराला रंग चढला आहे. पण, त्याआधीच काही ठिकाणी राज्यभरात बिनविरोध निवड झाली आहे. काही ठिकाणी उमेदवारांनी माघार घेतली तर काही ठिकाणी अर्ज बाद झाल्यामुळे उमेदवार विजयी झाली आहे. मात्र, भाजपने या निवडणुकीत आतापर्यंत १०० जागा जिंकल्याचा दावा केला आहे. तर ३ ठिकाणी बिनविरोध नगराध्यक्ष निवडून आले आहे.

advertisement

नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणूक ही महापालिका निवडणुकांआधी राजकीय पक्षांची चाचणी समजली जात आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट टक्कर सुरू आहे. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर भाजपकडून राज्यात किती जागा जिंकल्यात याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत आतापर्यंत भाजपच्या १०० नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे, अशी माहिती  भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. अनेक उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. भाजप पुरस्कृत उमेदवारांची सेंच्युरी झाली आहे. सर्वाधिक जागा या उत्तर महाराष्ट्रात जिंकल्या आहे. उत्तर महाराष्ट्रात आतापर्यंत 49 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उत्तर महाराष्ट्र हा भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्यासोबतच मंत्री जयकुमार रावल यांनीही आपल्या होमग्राऊंडमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

advertisement

तर त्यापाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपने 41 जागा जिंकल्याचा दावा केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत एकत्र निवडणूक लढवली जात आहे. बारामतीत अजित पवारांच्या होमग्राऊंडमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. तर साताऱ्यात भाजपचं कमळं उमललं आहे. पश्चिम महाराष्ट्रानंतर कोकण-४, मराठवाड्यात ३ आणि विदर्भामध्ये ३ जागा जिंकल्या असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं आहे.

advertisement

कुठल्या विभागात किती नगरसेवक बिनविरोध?

- कोकण-४

- उत्तर महाराष्ट्र-४९

- पश्चिम महाराष्ट्र-४१

- मराठवाडा-३

- विदर्भ-३- उत्तर महाराष्ट्र-४९

- पश्चिम महाराष्ट्र-४१

- कोकण - ०४

- मराठवाडा-३

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
'परिस्थिती बरी नाही, जाऊ नको' मृत 'श्री'ची परिस्थिती ऐकून डोळ्यात येईल पाणी!
सर्व पहा

- विदर्भ-३

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagar Parishad Election 2025: नगर परिषदेतही भाजपचा जलवा, आतापर्यंत 100 जागा जिंकल्याचा दावा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल