TRENDING:

नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर श्रेयवादाची लढाई शिगेला, एकाच कामाचे, एकाच कुटुंबातील तिघांचे वेगवेगळे पोस्टर

Last Updated:

प्रभागातील एकाच कुटुंबातील तिघांनी अमुक निधी आमच्यामुळे मंजूर झाल्याचा दावा केला आणि प्रभागात पोस्टरबाजी केली. कराडमध्ये नगरपालिकेच्या इच्छुकांमधील श्रेयवादाचा विषय चर्चेचा ठरलाय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विशाल पाटील, प्रतिनिधी सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. निवडणुकीची तयारी अनेक जण करीत आहेत. मात्र तयारी करीत असताना श्रेयवादाच्या लढाईने डोके वर काढले आहे. कराडमध्ये नगरपालिकेच्या इच्छुकांमधील श्रेयवादाचा विषय चर्चेचा ठरलाय.
News18
News18
advertisement

कराड शहरात प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजप आमदार अतुल भोसले यांनी १ कोटी ५७ लाख ६८ हजार रुपयांचा निधी मंजूर केला. हा निधी मंजूर झाल्याचे जाहीर झाल्यानंतर याच प्रभागातील एकाच कुटुंबातील तिघांनी हा निधी आमच्यामुळे मंजूर झाल्याचा दावा केला आणि प्रभागात पोस्टरबाजी केली.

ही पोस्टरबाजी झाल्यानंतर याच प्रभागातील अज्ञात नागरिकांनी या पोस्टरबाजी विरोधात बॅनरबाजी केली. यावरती फुकटचे श्रेय घेऊ नका, रस्ता चांगला करा, असे सुनावण्यात आले. हे बॅनर लावणारे शिवाजी पवार याच प्रभागातील माजी नगरसेविका पल्लवी पवार यांचे पती आहेत. आम्ही फक्त पाठपुरावा केल्याचे पोस्टर लावल्याचे सांगितले तर त्यांचे चुलत बंधू माजी नगरसेवक महादेव पवार यांनी, आम्ही सातत्याने या रस्त्याबाबत अतुल भोसले यांच्याकडे पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. तर त्यांचेच बंधू भाजप कार्यकर्ते सचिन पवार यांनी देखील हे श्रेय सगळ्यांचेच असल्याचे सांगितले.

advertisement

सरीकडे याच परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत गुप्ते यांनी पोस्टरवॉर न करता रस्ता चांगला करावा, अशी मागणी करत हे श्रेय सर्व स्थानिक नागरिकांचे असल्याचे सांगत प्रभागात स्थानिक नागरिकांनी बॅनरबाजीविरोधात लावलेल्या पोस्टरचे समर्थन केले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

एकूणच काय नगरपालिका निवडणुका जवळ येतील तसे राजकीय हेवेदावे आणि श्रेयवाद वाढत जाईल, हे नक्की. येणाऱ्या काळात प्रभागातील रस्ता कधी होणार आणि नेमका श्रेय कोण घेणार ही चर्चा सध्या कराडवासियांमध्ये रंगतेय.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर श्रेयवादाची लढाई शिगेला, एकाच कामाचे, एकाच कुटुंबातील तिघांचे वेगवेगळे पोस्टर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल