शिरसाट यांची लेक ज्या प्रभागातून निवडणूक लढवत आहे, तो प्रभाग शिवसेनेचा गड आहे. शिरसाट यांचे मोठे व्हाईट हाऊस घर झाले, पण इथल्या गरीब लोकांना राहायला घर नाही. शिवसेनेच्या भरवशावर जे मोठे झाले, त्यांनी इथे काय केले? ज्यांनी मोठे केले त्यांना सोडून व्हाईट हाऊसमध्ये गेले. तुम्ही तुमच्या मुलीसाठी पदमपुरा दावावर लावला. तुम्ही कसले पालक, अशा शब्दात संजय केनेकर यांनी शिरसाट यांच्यावर प्रहार केले.
advertisement
संजय शिरसाट यांनी मात्र या सगळ्या आरोपांवर जास्त बोलणे टाळले. भाजपच्या आरोपांना उत्तरे देऊन टीका टिप्पणी अडचणीची ठरणार नाही, अशा हेतूने सावध पवित्रा घेतला. केवळ प्रभागातील लोकांना माझ्या नव्या घराचा पत्ता माहिती झाला आहे, असे शिरसाट म्हणाले.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची लेक हर्षदा शिरसाट या महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हर्षदा शिरसाट या प्रभाग क्रमांक १८ मधून छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक लढवत आहेत.
संजय शिरसाट यांची लेक हर्षदा शिरसाट पायलट आहेत. त्यांच्याकडे दीड कोटींची मालमत्ता आहे. तसेच अनेक कंपन्या आणि व्यक्तींकडून त्यांना २ कोटी २९ लाख रूपये येणे बाकी असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे सोने किंवा हिऱ्याचे अजिबातच दागिने नाहीत.
