घरगुती तेलघाणा व्यवसाय कसा सुरू कराल? तेल काढण्याची प्रक्रिया कशी? किती येतो खर्च? Video
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
तेलांची घरगुती पद्धतीने निर्मिती करण्याकडे अनेक नागरिकांचा कल वाढला आहे. पारंपरिक तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित तेलघाणा यंत्र या कामासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
छत्रपती संभाजीनगर : शुद्ध, भेसळमुक्त आणि आरोग्यदायी तेलाला सध्या बाजारात मोठी मागणी वाढताना दिसत आहे. शेंगदाणे, करडी, जवस, करडई, सोयाबीन यांसारख्या विविध तेलांची घरगुती पद्धतीने निर्मिती करण्याकडे अनेक नागरिकांचा कल वाढला आहे. पारंपरिक तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित तेलघाणा यंत्र या कामासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. कमी खर्चात आणि कमी जागेत हे यंत्र वापरून दर्जेदार तेल काढता येते. ग्रामीण तसेच शहरी भागात तेलघाणा व्यवसाय हा उत्पन्नाचा चांगला स्रोत ठरत आहे. तेलघाणा यंत्राचा वापर कसा करायचा, त्याची क्षमता किती आहे आणि व्यवसाय सुरू करताना कोणत्या बाबींची काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती तेलघाणा यंत्र विक्रेते योगेश सुनेवाड यांच्याकडून जाणून घेऊ.
तेलघाणा यंत्रातून तेल काढण्याची प्रक्रिया कशी?
शेंगदाणे, जवस, यासह विविध प्रकारचे भेसळमुक्त आणि शुद्ध तेल काढण्यासाठी सर्वप्रथम यंत्राच्या वरच्या बाजूने तेलबिया टाकायच्या. समोरच्या बाजूने त्या बियांचा चोथा काढला जातो तर खालच्या बाजूने तेल निघते आणि डब्यामध्ये जमा होते. डब्यामध्ये जमा झालेले तेल अंतिम टप्प्यात चाळणीने गाळून घ्यायचे. तेलघाणा उपकरण वापरण्यास सोपे आहे, यामध्ये दोन बाबी असतात. त्यामध्ये कराड आणि ट्यूब असते. या माध्यमातून निघणाऱ्या तेलाचे तापमान 60 ते 70 डिग्रीपर्यंत काढले जाते.
advertisement
तेलघाणा यंत्र कोणी वापरावे..
तेलघाणा यंत्र वापरण्यास सोप्या पद्धतीचे असल्यामुळे ते 10 ते 12 वर्षाच्या मुलापासून ते 65 वयापर्यंतचे नागरिकही हे यंत्र हाताळू शकतात आणि या माध्यमातून तेल निर्मिती करू शकतात. हे यंत्र विशेषतः पूर्ण स्टील बॉडी मध्ये बनवण्यात आलेले आहे. त्यामुळे या यंत्राला गंज चढत नाही व आरोग्यासही घातक ठरत नाही. तसेच हे यंत्र 10 ते 15 वर्ष टिकते आणि त्याचे जीवन असते.
advertisement
तेलघाणा व्यवसाय कसा सुरू करावा?
तेलघाणा व्यवसाय सुरु करायचा असल्यास व्यवसायासाठी तेलघाणा यंत्र अधिक फीचरमध्ये आणि मोठ्या साईजमध्ये मिळते. त्या माध्यमातून प्रत्येकी तासाला पाच ते दहा लिटर तेल काढता येते. तसेच हे यंत्र घरी वापरायचं झाल्यास छोट्या साईजमध्ये देखील उपलब्ध आहे. यामधून प्रत्येकी तासाला दोन ते अडीच लिटर तेल काढता येते.
advertisement
तेलघाणा यंत्राची किंमत किती?
घरगुती वापरासाठी छोट्या तेलघाणा यंत्राची किंमत 18 हजार रुपयांपासून ते 30 हजार रुपयांपर्यंत आहे तसेच व्यावसायिक क्षमतेचे यंत्र 1.60 लाख रुपयांपासून ते 2.50 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. कंपनी आणि यंत्राचे फीचर वेगवेगळे असल्यामुळे त्याची किंमत देखील वेगळी आहे.
Location :
Aurangabad Cantonment,Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 5:21 PM IST
मराठी बातम्या/मनी/
घरगुती तेलघाणा व्यवसाय कसा सुरू कराल? तेल काढण्याची प्रक्रिया कशी? किती येतो खर्च? Video







