व्हिक्टिम कार्ड खेळू नका... सोलापुरात मतदानापूर्वी भाजप शिंदेसेनेत जुंपली, दोस्तीत कुस्ती
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Solapur Mahapalika Election: शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी भाजप आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर गंभीर आरोप केले.
प्रीतम पंडित, प्रतिनिधी, सोलापूर: सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जुंपल्याचे चित्र आहे. अनेक प्रभागांत भाजप शिंदेसेनेत हायव्होल्टेज लढती असणार आहेत. भाजप बळाचा वापर करत असल्याचा आरोप शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी केला आहे. तर बळाचा वापर केला असता तर निवडणूक झालीच नसती, असे आमदार देवेंद्र कोठे म्हणाले.
शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी भाजप आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर गंभीर आरोप केले. शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलीस यंत्रणेचा वापर करून त्रास देण्याचे काम सुरू असल्याचे अमोल शिंदे म्हणाले.
शिंदेसेनेच्या आरोपांना आमदार देवेंद्र कोठे यांचे उत्तर
अमोल शिंदे यांनी केलेले आरोप निराधार आहेत. महापालिकेची निवडणूक आम्ही ताकदीने लढवत आहोत. सत्ताधारी म्हणून जर आम्ही त्रास दिला असता, पोलिसी कारवाया केल्या असत्या तर निवडणूकच झाली नसती, असे देवेंद्र कोठे म्हणाले.
advertisement
तसेच चुकीचे आरोप करून शेवटच्या दिवशी व्हिक्टिम कार्ड खेळून त्याचा वापर मतदानाला कसा येईल याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत असल्याचे देवेंद्र कोठे म्हणाले. दुसरीकडे महापालिका निवडणुकीत भाजप आरामात सत्तेवर येईल, असे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 5:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
व्हिक्टिम कार्ड खेळू नका... सोलापुरात मतदानापूर्वी भाजप शिंदेसेनेत जुंपली, दोस्तीत कुस्ती










