Board Exam: कॉपी बहाद्दरांनो, आता काही खरं नाही! बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी भरारी पथक

Last Updated:

फेब्रुवारी- मार्च 2026 कालावधीत दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये होणार्‍या गैर प्रकारांवर आळा घालण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून अनेक उपाय योजना केल्या जात आहेत. कॉपी बहाद्दरांना आळा घालण्यासाठी भरारी पथकांची निवड करण्यात आली आहे.

Board Exam: कॉपी बहाद्दरांनो जरा सावध! बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी भरारी पथक
Board Exam: कॉपी बहाद्दरांनो जरा सावध! बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी भरारी पथक
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. फेब्रुवारी- मार्च 2026 या कालावधीत परीक्षांमध्ये होणार्‍या गैर प्रकारांवर आळा घालण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून अनेक उपाय योजना केल्या जात आहेत. कॉपी बहाद्दरांना आळा घालण्यासाठी भरारी पथकांची निवड करण्यात आली आहे. बोर्डाच्या परीक्षे दरम्यान घडणार्‍या अनुचित प्रकारांवर आळा घालण्यासाठी बोर्डाने नवीन उपाय योजना केल्या आहेत.
परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांकडून होणार्‍या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी विभागीय, जिल्हा आणि विशेष भरारी पथकांची नियुक्ती केली गेली आहे. अनेकदा परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी वर्गाच्या बाहेरून अनेक लोकं कॉपी पुरवतानाचे व्हिडिओ आपण परीक्षेच्या काळात पाहिले असतील, या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी शिक्षण मंडळाने आता भरारी पथकाचीच नियुक्ती केली आहे. भरारी पथक विद्यार्थ्यांमध्ये आपआपसात होणाऱ्या कॉपी पुरवण्याच्या प्रकरणाला आळा घालणार आहे.
advertisement
दरम्यान, परीक्षा केंद्रांवर राज्य परीक्षा मंडळ 14 भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. राज्य परीक्षा मंडळ अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी याबाबत आदेश जारी केले. परिक्षेच्या काळात परीक्षा केंद्रावर प्रमुखांना सीसीटीव्ही कॅमेरा लावणे अनिवार्य केले आहे. या माध्यमातून परिक्षेच्या काळात केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी लक्ष दिले जाणार आहे. फेब्रुवारी 2026 पासून बारावीच्या बोर्डाच्या परिक्षेला सुरूवात होणार आहे. त्यासाठी ज्युनियर कॉलेजसह शाळांमध्येही तयारी जोरदार सुरू झाली आहे. परिक्षेच्या दृष्टीने परीक्षा केंद्रावर तयारी सुरू झाली आहे. तर, 12 जानेवारीपासून विद्यार्थ्यांना हॉलतिकिट देण्याचे काम सुरू झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Board Exam: कॉपी बहाद्दरांनो, आता काही खरं नाही! बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी भरारी पथक
Next Article
advertisement
What is PADU:  राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत क
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

View All
advertisement