Success Story : शेतकऱ्यानं शेतीत लावलं डोकं, बेदाणा विक्रीनं पालटलं नशीब, 14 लाखांची कमाई
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
अनेक शेतकरी द्राक्ष लागवडीकडे वळले असून, हे पीक त्यांच्यासाठी आर्थिक समृद्धीचे साधन बनल्याचे दिसत आहे.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी द्राक्ष लागवडीकडे वळले असून, हे पीक त्यांच्यासाठी आर्थिक समृद्धीचे साधन बनल्याचे दिसत आहे. अशाच प्रकारची शेती मोहोळ तालुक्यातील पेनुर येथील शेतकरी अरविंद काळे यांनी थॉमसन व्हरायटीच्या द्राक्षांची लागवड केली आहे. त्यापासून बेदाणा तयार करण्याचं काम करत आहेत. दीड एकरामध्ये द्राक्ष लागवडीसाठी 2 लाख रुपये खर्च आला असून 15 लाख रुपयांचा नफा अरविंद काळे यांना मिळणार आहे.
पेनुर गावात राहणाऱ्या अरविंद काळे हे गेल्या 2004 सालापासून द्राक्षाची बाग करत आहेत. थॉमसन व्हरायटीच्या द्राक्षाची लागवड काळे यांनी केली असून या बेदाण्याला चांगली मागणी बाजारात आहे. लागवड केल्यानंतर एप्रिलमध्ये छाटणी केली जाते. पाण्याचे नियोजन, खत व्यवस्थापन केलं जातं. त्यानंतर जूनपर्यंत काडी परिपक्व केली जाते.
advertisement
तसेच ऑक्टोबरमध्ये छाटणी केली जाते. तर या थॉमसन व्हरायटीच्या द्राक्षपिकावर रोग होऊ नये म्हणून वेळोवेळी फवारणी केली जाते. थॉमसन व्हरायटीच्या द्राक्षाचा उपयोग बेदाणे तयार करण्यासाठी केला जातो. हा बेदाणा एकरी साडेचार ते पाच टनापर्यंत उत्पन्न मिळतं. दीड एकरमध्ये द्राक्ष लावण्यासाठी अरविंद काळे यांना 2 लाख रुपयांचा खर्च आला आहे. तर खर्च वजा करून 14 लाख रुपये पर्यंतचा नफा काळे यांना मिळणार आहे.
advertisement
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत या बेदाण्याची विक्री अरविंद काळे करत आहेत. मागील वर्षी सरासरी 300 रुपये किलो प्रमाणे या बेदाण्याला भाव मिळाला होता. मागील वर्षी खर्च वजा करून 10 लाख 46 हजार रुपयांचा नफा अरविंद यांना मिळाला होता. तर याही वर्षी खर्च वजा करून 14 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळणार असल्याची माहिती अरविंद काळे यांनी दिली आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 2:58 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : शेतकऱ्यानं शेतीत लावलं डोकं, बेदाणा विक्रीनं पालटलं नशीब, 14 लाखांची कमाई







