Silent letters : Knife शब्द बोलताना K का उच्चारत नाही, तो 'नाइफ' असा का वापरला जातो? त्यामधील K चं काम काय

Last Updated:
Silent letters Grammar Rules : बऱ्याचदा आपण मुलांना इंग्रजी शिकवताना सांगतो की, "बाळा, 'K' नंतर 'N' आला की 'K' सायलेंट असतो." पण हे असं का? याचं उत्तर मात्र अनेकांना माहित नसतं.
1/10
दैनंदिन जीवनात इंग्रजी बोलताना किंवा वाचताना आपण अनेकदा थबकतो. कधी स्पेलिंग चुकते, तर कधी उच्चार.... त्यातल्या त्यात 'Silent Letters' म्हणजे असे काही अक्षरे जे स्पेलिंगमध्ये तर असतात, पण उच्चारताना गायब होतात, त्यांनी तर अनेकांची झोप उडवली आहे. अशीच एक वस्तू ज्याचा इंग्रजी उच्चार सायलेंट अक्षरापासून होतो आणि ती वस्तू आपल्या स्वयंपाक घरातील महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे 'Knife' (सुरी).

advertisement
2/10
आता विचार करा, जर कोणी याला 'क्नाइफ' म्हटलं तर तो उच्चर चुकाचा ठरेल, काही लोक तुमच्यावर हसतील सुद्धा, पण गंमत म्हणजे, एका काळी या शब्दाचा उच्चार 'क्नाइफ' असाच केला जायचा. मग हा 'K' अचानक शांत का झाला? यामागचा रंजक इतिहास आणि भाषेचे शास्त्र आज आपण समजून घेऊया.

3/10
बऱ्याचदा आपण मुलांना इंग्रजी शिकवताना सांगतो की,
बऱ्याचदा आपण मुलांना इंग्रजी शिकवताना सांगतो की, "बाळा, 'K' नंतर 'N' आला की 'K' सायलेंट असतो." पण हे असं का? याचं उत्तर दडलंय हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासात.
advertisement
4/10
'Knife' हा शब्द मूळचा जुन्या इंग्रजीतील (Old English) आणि जर्मन धाटणीचा आहे. साधारणपणे सन 1000 ते 1500 च्या दरम्यान, इंग्लंडमध्ये लोक या शब्दातील प्रत्येक अक्षराचा स्पष्ट उच्चार करत असत. त्यावेळी हा शब्द 'Cniht' किंवा 'K-nife' असा 'क्' चा स्पष्ट आवाज काढून उच्चारला जायचा. केवळ 'Knife' च नाही, तर 'Know', 'Knee', 'Knight' या सर्व शब्दांत 'K' जोरात ओरडून सांगितला जायचा.

5/10
मग 'K' सायलंट का झाला?16 व्या आणि 17 व्या शतकात इंग्रजी भाषेत एक मोठा बदल झाला, ज्याला भाषेचे अभ्यासक 'Great Vowel Shift' म्हणतात. या काळात लोकांच्या बोलण्याची शैली बदलू लागली.

6/10
1. उच्चारातील कठीणता:'K' आणि 'N' हे दोन्ही व्यंजन (Consonants) एकापाठोपाठ उच्चारणे जिभेसाठी थोडे कठीण असते. तुम्ही स्वतः प्रयत्न करून पहा, 'क्नाइफ' म्हणताना जिभेला जास्त कसरत करावी लागते, त्याऐवजी 'नाइफ' म्हणणे जास्त सोपे वाटते.

7/10
2. विदेशी प्रभाव:त्या काळात फ्रेंच भाषेचा प्रभाव वाढला होता. फ्रेंच भाषेत शब्दांच्या सुरुवातीला असे कठीण जोडशब्द उच्चारण्याची पद्धत नव्हती. हळूहळू सुशिक्षित वर्गाने आणि राजघराण्यातील लोकांनी सोपे उच्चार स्वीकारले.

8/10
3. छापखाना (Printing Press):जेव्हा छपाई यंत्रांचा शोध लागला, तेव्हा शब्दांचे स्पेलिंग फिक्स झाले. लोकांनी उच्चार बदलले तरी जुन्या परंपरेनुसार स्पेलिंगमध्ये 'K' तसाच राहिला. परिणामी, 'K' लिहिला जाऊ लागला पण बोलण्यातून बाद झाला.

9/10
भाषेचे विज्ञान काय सांगते? (Phonetics Context)भाषेच्या विकासामध्ये
भाषेचे विज्ञान काय सांगते? (Phonetics Context)भाषेच्या विकासामध्ये "Principle of Least Effort" नावाचा एक नियम काम करतो. मानवी प्रवृत्ती नेहमीच कमीत कमी मेहनतीत जास्तीत जास्त संवाद साधण्याची असते. 'Kn' च्या जोडीमध्ये 'N' चा आवाज इतका प्रभावी असतो की 'K' चा उच्चार करणे हळूहळू अनावश्यक वाटू लागले.
advertisement
10/10
आज आपण 'Knife' मधील 'K' उच्चारत नसलो तरी, तो त्या शब्दाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत तिथे बसलेला आहे. तो आपल्याला सांगतो की, ही भाषा शतकानुशतके कशी बदलत आली आहे. त्यामुळे पुढच्या वेळी सुरी वापरताना लक्षात ठेवा, तुम्ही फक्त एक वस्तू वापरत नाही आहात, तर हजार वर्षांचा भाषिक वारसा तुमच्या हातात आहे.

What is PADU:  राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत क
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

View All
advertisement