छत्रपती संभाजीनगर : भारतीय संस्कृतीत सण-उत्सव केवळ आनंदासाठी साजरे केले जात नाहीत, तर त्यामागे धार्मिक, सामाजिक, ऋतूमानाशी संबंधित तसेच वैज्ञानिक कारणेही दडलेली असतात. प्रत्येक सणाची स्वतःची अशी एक ओळख असते. ठरलेले धार्मिक विधी, विशिष्ट पोशाख, पारंपरिक पदार्थ आणि लोकपरंपरा. नव्या वर्षाची सुरुवात होताच साजरा केला जाणारा मकर संक्रांत हा पहिला महत्त्वाचा सण मानला जातो. देशभरात विविध नावांनी आणि विविध पद्धतीने हा सण साजरा होत असला, तरी त्यामागील मूळ भावार्थ एकच आहे. निसर्गाचे आभार मानणे आणि नव्या पर्वाची सुरुवात करणे.
Last Updated: Jan 14, 2026, 15:50 IST


