आधी संस्काराच्या गप्पा, आता सागर कारंडेला घालून पाडून बोलली; नेटकऱ्यांनी घेतली तन्वीची शाळा

Last Updated:
Sagar Karande - Tanvi Kolte : बिग बॉस मराठी 6 चं पहिलं नॉमिनेशन कार्स पार पडणार आहे. यावेळी तन्वी आणि सागर यांच्यात तूफान राडा झाल्याचं पाहायला मिळतंय.
1/8
'बिग बॉस मराठी 6' च्या घरात पहिली नॉमिनेशनच्या प्रक्रिया पार पडणार आहे.  नॉमिनेशन जवळ येताच घरातील समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत असून. सगळ्यांचे खरे चेहरे समोर आले आहेत.
'बिग बॉस मराठी 6' च्या घरात पहिली नॉमिनेशनच्या प्रक्रिया पार पडणार आहे. नॉमिनेशन जवळ येताच घरातील समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत असून. सगळ्यांचे खरे चेहरे समोर आले आहेत.
advertisement
2/8
नुकताच एक प्रोमो समोर आला आहे ज्यात तन्वी कोलते आणि सागर कारंडे यांच्यात चांगलाच वाद झाल्याचं पाहायला मिळतंय.   हा वाद इतका टोकाला गेला की तन्वी सागर कारंडेला घालून पाडून बोलली. सागर कारंडेला उलट उत्तर दिल्याने सागर कारंडेच्या फॅन्सने तिची चांगलीच शाळा घेतली आहे.
नुकताच एक प्रोमो समोर आला आहे ज्यात तन्वी कोलते आणि सागर कारंडे यांच्यात चांगलाच वाद झाल्याचं पाहायला मिळतंय. हा वाद इतका टोकाला गेला की तन्वी सागर कारंडेला घालून पाडून बोलली. सागर कारंडेला उलट उत्तर दिल्याने सागर कारंडेच्या फॅन्सने तिची चांगलीच शाळा घेतली आहे.
advertisement
3/8
पहिल्या नॉमिनेशन टास्कदरम्यान तन्वीने सागर कारंडेचा फोटो असलेली पतंग कापली. एवढंच नाही तर, तिने थेट
पहिल्या नॉमिनेशन टास्कदरम्यान तन्वीने सागर कारंडेचा फोटो असलेली पतंग कापली. एवढंच नाही तर, तिने थेट "सागर कारंडे या शोसाठी अपात्र आहेत" असं सांगितलं. तन्वीच्या या आक्रमक भूमिकेमुळे सागर प्रचंड संतापलेला प्रोमोमध्ये स्पष्टपणे दिसतो.
advertisement
4/8
तन्वीच्या आरोपांना उत्तर देताना सागर म्हणतो,
तन्वीच्या आरोपांना उत्तर देताना सागर म्हणतो, "एवढी तरी अक्कल पाहिजे की आपण काय बोलतोय!” मात्र तन्वीही मागे हटताना दिसत नाही. ती थेट म्हणते, “मी नॉनसेन्स आहे, तुम्ही बोलायची गरज नाही.
advertisement
5/8
वाद अधिकच वाढतो, जेव्हा सागर तिला मध्ये न बोलण्याचा इशारा देत म्हणतो की,
वाद अधिकच वाढतो, जेव्हा सागर तिला मध्ये न बोलण्याचा इशारा देत म्हणतो की, "मी तुला आधीच सांगितलं होतं, मी बोलताना मध्ये बोलायचं नाही." यावर तन्वीचं सडेतोड उत्तर येतं, "मी तुझ्या आवाजाला घाबरत नाही, तू मला शिकवणार?"
advertisement
6/8
एक दिवसाआधीच 'मिशन राशन' टास्कनंतर किचन एरियामध्ये तन्वीने घरच्या कामांवरून जोरदार भांडण केलं होतं.
एक दिवसाआधीच 'मिशन राशन' टास्कनंतर किचन एरियामध्ये तन्वीने घरच्या कामांवरून जोरदार भांडण केलं होतं. "सोनाली राऊतला काम करायला लागेल, तिला हातात कोणी देणार नाही. तुझं तू बनवून खा," असं ती म्हणालेली. त्यानंतर बाजूला जाऊन रडताना तन्वी म्हणाली होती, "माझ्या आई-वडिलांनी मला असे संस्कार शिकवले नाहीत की दुसऱ्याला उपाशी ठेवून स्वतःचं पोट भरायचं."
advertisement
7/8
याच पार्श्वभूमीवर आता स्वतःपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अभिनेता सागर कारंडेला उघडपणे उलट बोलणं, हा मुद्दा नेटकऱ्यांना खटकलेला दिसतो आहे. सोशल मीडियावर
याच पार्श्वभूमीवर आता स्वतःपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अभिनेता सागर कारंडेला उघडपणे उलट बोलणं, हा मुद्दा नेटकऱ्यांना खटकलेला दिसतो आहे. सोशल मीडियावर "आधी संस्काराच्या गप्पा आणि आता अशी भाषा?" असा सवाल करत अनेकांनी तन्वीला ट्रोल केलं आहे.
advertisement
8/8
तन्वीला ट्रोल करत एका युझरनं लिहिलंय,
तन्वीला ट्रोल करत एका युझरनं लिहिलंय, "हिला मोठ्या लोकांशी कसं बोलायचं याची अक्कल नाही". दुसऱ्याने लिहिलंय, "हिचं करिअर सुरू होण्याआधीच संपणार आहे. किती उद्धट आहे." आणखी एकानं लिहिलंय, "ही कलाकार असून हिला दुसऱ्या कलाकाराचा रिस्पेक्ट ठेवता येत नाही. सागर सरांची अक्कल काढतेस."
advertisement
What is PADU:  राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत क
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

View All
advertisement