स्थायी समितीच्या बैठकीत नाले सफाई वर चर्चा सुरू असताना ठाकरे गटाचे नगरसेवक रमाकांत रहाटे अचानक आक्रमक झाले. तुमचं सरकार आता आलं आहे, तुमची जबाबदारी आहे. नालेसफाई पूर्ण झाली पाहिजे असे ते म्हटले. त्यांना भाजपच्या नगरसेविका प्रिती साटम यांनी मुद्दा मांडताना भाजपचे सरकार आता आहे आणि अपेक्षा जनतेची अपेक्षा वाढलीय असे म्हटले.
advertisement
त्यावर ठाकरे गटाचे नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी आक्षेप घेताना 'स्वतःचं ठेवावं झाकून , दुसऱ्याचं पाहावं वाकून' अशी म्हण वापरली.
यावर शिंदेसेनेच्या नगरसेविका यामिनी जाधव यांनी तात्काळ आक्षेप घेतला. ही म्हण इथे बसलेल्या 'महिला नगरसेवकांच्या मनाला लज्जा उत्पन्न करणारी आहे' असे यामिनी जाधव म्हणाल्या. नगरसेविका यामिनी जाधव यांनी ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी माफी मागावी, असा प्रस्ताव मांडला. मात्र त्यानंतर हा विषय स्थायी समिती अध्यक्षांच्या मध्यस्थीनंतर निवळला. 'विषय महत्वाचा आहे, पण दुर्लक्ष करण्यासारखा' असं त्यांनी म्हटलं.
