याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे ते धारावी उड्डाणपुलाचा पहिला टप्पा 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर पुढील दोन महिन्यांनी पुलाच्या दोन लेन वाहतुकीसाठी खुल्या केल्या जाणार आहेत. यामुळे माहिम कॉजवेकडे जाण्यासाठी उड्डाणपुलावर थेट प्रवेश मिळणार आहे. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी, वांद्रे ते धारावी येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली.
advertisement
BEST Ticket: प्रभादेवी पूल बंद झाल्याचा प्रवाशांना भुर्दंड! बेस्ट आकारतेय दुप्पट तिकीट
मिठी नदी पात्र रुंदीकरणाअंतर्गत वांद्रे ते धारावी दरम्यान पुलाची पुनर्बांधणी केली जात आहे. नदीच्या प्रवाहाला कमीत कमी अडथळा व्हावा, या उद्देशाने उड्डाणपुलाचं काम दोन टप्प्यांत केलं जात आहे. पहिल्या टप्प्यातील पुलाचं बांधकाम 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट मुंबई महानगरपालिकेनं निश्चित केलं आहे. याशिवाय, वांद्रे ते म्हाडा स्कायवॉक देखील डिसेंबर 2025 पर्यंत सुरू करण्याबाबत हालचाली सुरू आहेत.
अभिजीत बांगर म्हणाले, "पहिल्या टप्प्यात उभारलेल्या उड्डाणपुलाचं बांधकाम 90 टक्के पूर्ण झालं आहे. 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. यानंतर दक्षिणेकडील दोन मार्गिका (लेन) सुरू होतील. माहीम कॉजवेकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर थेट प्रवेश मिळणार असून वाहतुकीचा वेग वाढेल. दुसऱ्या टप्प्याचं काम देखील लवकरच सुरू केलं जाईल. हे काम 18 महिन्यांत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे."