TRENDING:

बुलढाणा हादरलं! आठवीत शिकणाऱ्या दोन मित्रांनी 48 तासांत संपवलं आयुष्य

Last Updated:

आठवीत शिकणाऱ्या दोन वर्गमित्रांनी दोन दिवसांच्या अंतरानं आपलं आयुष्य संपवलं. हा घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. या दोघांनी टोकाचं पाऊल का उचललं याबाबतच कारण अद्याप समोर आलेलं नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलढाणा: जवळपास 7 तास सोबत, अगदी अभ्यासापासून ते शाळेत खेळण्यापर्यंत दंगा, मस्ती करणाऱ्या दोन वर्गमित्रांच्या कहाणीनं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. आठवीत शिकणाऱ्या दोन वर्गमित्रांनी दोन दिवसांच्या अंतरानं आपलं आयुष्य संपवलं. हा घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. या दोघांनी टोकाचं पाऊल का उचललं याबाबतच कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
AI फोटो
AI फोटो
advertisement

बुलडाणा शहरातील एका नामांकित विद्यालयात आठव्या वर्गात शिकणा-या दोन वर्ग मित्रांनी राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं. दोन दिवसातील दुसऱ्या घटनेने जिल्ह्यातील पालकांमध्ये अस्वस्थता पसरली. अवघ्या चौदा वर्षे वयाच्या दोन विद्यार्थ्यांनी लागोपाठ दोन दिवसांच्या अंतराने असे टोकाचे पाऊल उचलल्याने शैक्षणिक क्षेत्रही चिंतीत झाले आहे.

advertisement

शहरातील भारत विद्यालयात आठव्या वर्गात शिकणा-या नमन अरुण राऊत या विद्यार्थ्याने शिक्षक व शिक्षिका असलेले त्याचे आईवडील हे कर्तव्यावर बाहेरगावी गेले असतांना 11 फेब्रुवारी रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या दुःखद घटनेच्या पाठोपाठ काल सायंकाळी अथर्व वैभव राणे याने शाळेतून परतल्यानंतर सुंदरखेड परिसरातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
जालन्याच्या शेतकऱ्यानं घेतलं पैशाचं पीक! एका एकरात 10 लाखांची कमाई, काय केलं? Vi
सर्व पहा

वैभवचे वडील कारागृह पोलीस आहेत. बुलडाण्यातील अल्पवयीन वर्गमित्र विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांनी पालकवर्गाला प्रचंड धक्का बसला आहे. या अनाकलनीय घटनांमागील कारण शोधणे हे पोलिसांसमोर आव्हान आहे. पोलिसांकडून पालक, मित्र परिवार आणि शाळेतील शिक्षकांची चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर संपूर्ण गाव हादरलं आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बुलढाणा हादरलं! आठवीत शिकणाऱ्या दोन मित्रांनी 48 तासांत संपवलं आयुष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल