TRENDING:

Buldhana News : बुलढाण्यात टक्कल पडणाऱ्यांची संख्या शंभरीपार! 11 गावात पोहोचला आजार, कारण मात्र अद्याप गूढच?

Last Updated:

बुलढाणा जिल्ह्यात टक्कल पडणाऱ्या आजाराने धुमाकुळ घातला आहे. या आजाराचे सुरूवातीला 25 ते 30 रूग्ण सापडले होते.मात्र हा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे.टक्कल पडणाऱ्या रूग्णांचा आकडा 104 वर गेला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Buldhana mysterious disease : राहुल खंडारे, बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात टक्कल पडणाऱ्या आजाराने धुमाकुळ घातला आहे. या आजाराचे सुरूवातीला 25 ते 30 रूग्ण सापडले होते.मात्र हा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे.टक्कल पडणाऱ्या रूग्णांचा आकडा 104 वर गेला आहे.तसेच 11 गावात हा आजार पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. तसेच फंगल इन्फेक्शनमुळे हा आजार पसरल्याची माहिती आहे. मात्र टक्कल पडण्यामागे हेच ठोस कारण असू शकते,याची अद्याप पुष्ठी होऊ शकली नाही. मात्र या आजाराने नागरीक भयभीत आहेत.
buldhana villages lose hair
buldhana villages lose hair
advertisement

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील 11 गावांमध्ये आता हा आजार झपाट्याने पसरत चालला आहे. तसेच टक्कल पडण्याची संख्या आता 104 वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आले असून अकोला बुलढाणा येथील आरोग्य पथक बोडगाव येथे दाखल झालं आहे. तसेच टक्कल का पडतंय याचा शोध घेत आहे. तसेच हा आजार फंगल इन्फेक्शनमुळे होत असल्याचे आरोग्य विभागाने दिली आहे.मात्र हेच ठोस कारण असण्याची शक्यता कमी आहे.

advertisement

टक्कल पडण्याचे कारण काय?

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगावातील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. पाण्याची टीडीएस लेव्हलही भयंकर वाढली असल्याचं या पाण्याच्या तपासणीत उघड झालंय. गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं विष ठरतंय. खारबाण पट्ट्यातील या गावात पिण्याची पाण्याची वेगळी सोय केलेली आहे मात्र वापरण्याच्या पाण्यात नाइट्रेट सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्याने हे पाणी वापरण्यायोग्य देखील नसल्याचं धक्कादायक वात्सव समोर आल आहे.

advertisement

या गावात पसरला आजार

बोंडगाव,कालवड,कठोरा,भोनगाव,मच्छीद्रखेड,हिंगणा वैजनाथ,घुई,तरोडा कसबा,माटरगाव, पहुरजीरा,निम्बी या गावांमध्ये टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता 104 च्यावर पोहोचली आहे. वाढत्या तक्रारींची दखल घेत शेगाव तालुक्यात आरोग्य विभागाकडून घरोघरी सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.

आरोग्य अधिकारी काय म्हणाले? 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

इतक्या मोठ्या प्रमाणावर टक्कल का व्हावं यासाठी आम्ही डर्मेटोलॉजिस्ट सर्वे करत आहोत. डर्मेटोलॉजिस्टच हेच म्हणणं आहे, फंगल इन्फेक्शनमुळे हे केस जातायत. त्यासाठी आम्ही विविध स्तरावर पाणी सॅम्पल पाठवत आहोत. हेवी मेटल त्याच्यात असण्याची शक्यता असेल तर ते तपासण्यासाठी आपण पाण्याचे नमुने पाठवले आहेत. याचे अहवाल 7-8 दिवसात येतील. जिल्हा परिषद आरोग्य विभाग, साथ रोग अधिकारी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी,डर्मोटोलॉजिस्ट, स्किन स्पेशालिस्ट असे सगळे मिळून या आजाराचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Buldhana News : बुलढाण्यात टक्कल पडणाऱ्यांची संख्या शंभरीपार! 11 गावात पोहोचला आजार, कारण मात्र अद्याप गूढच?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल