रिकीच्या फोनमध्ये मुलींचे मेसेज...
विशाल उर्फ रिकी काकडे याची पत्नी नमिता दोन महिन्यांपासून नगर परिषदेमध्ये सफाई कामगार म्हणून कामं करत होती. काकडे दाम्पत्यास तीन आणि एक वर्षाचा मुलगा आहे. पत्नीला आपल्या नवऱ्यावर संशय होता. रिकीच्या फोनमध्ये मुलींचे मेसेजेस पाहून दोघांमध्ये वाद पेटला होता. 2020 मध्ये रिकी आणि नमिता यांचं लग्न झालं होतं. लग्नाच्या सहा महिन्यांतच सासू रेखा रघुवीर काकडे घरगुती कामांवरून टोमणे मारत मारहाण करू लागली.
advertisement
पत्नीने मोबाइल हिसकावला अन्...
मोठी नणंद भावना काकडे हे दोघं सासूचं ऐकून मारहाण करायचे, असा आरोप पिडीतेने केला आहे. पण घटनेच्या दिवशी पती विशालच्या मोबाइलवर एका मुलीचे मेसेज आले. त्यावेळी पत्नीने मोबाइल हिसकावला असता अनेक मेसेज दिसले. याबाबत विचारणा केली असता विशालने तिला मारहाण केली. सासू रेखा व नणंद भावनाने चिथावणी दिली अन् विशालने बॉटलमधील पेट्रोल नमिताच्या अंगावर ओतले अन् तिचा पदर गॅसला पेटवून दिला.
ड्रममधील पाण्याने आग विझवली
नमिताने स्वत:ला सावरलं अन् लगेच ड्रममधील पाण्याने आग विझवली. पत्नी नमिता काकडे यांनी तत्काळ बाथरूममध्ये धाव घेऊन पदर पाण्याने विझविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर नमिताने मागं पुढं पाहिलं नाही अन् पती, सासू व नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यामुळे आता विशालला शिक्षा होणार का? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.
