TRENDING:

Jalgaon: घराजवळ तो उभा होता अन् लपून त्याच्यावर झाडली गोळी, जळगावमधील घटना

Last Updated:

गोळीबाराचा आवाज ऐकून स्थानिक लोक धावून आले. गावकऱ्यांनी या तरुणाला तातडीने उपचारांसाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलवलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

जळगांव : उत्तर महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. अशातच ​जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र थांबताना दिसत नसून, सलग दुसऱ्या दिवशी गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. एरंडोल तालुक्यात एका ३१ वर्षीय तरुणावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  एरंडोल तालुक्यातील कढोली गावात संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.  ​जखमी झालेला तरुण एका खासगी कंपनीत कामाला आहे. पारोळा येथील रथोत्सव असल्याने तो आपल्या आई-वडिलांना घेऊन मूळ गावी (कढोली) जाणार होता. आज दुपारी ४ च्या सुमारास तो कढोली गावात घराच्या मागील बाजूस उभा होता.

त्यावेळी  अचानक गोळी आली आणि ती त्याच्या हाताच्या खांद्याखाली छातीजवळ घुसली. यामुळे मोठा रक्तस्राव झाला. अचानक गोळीबार झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. हा तरुण जागेवरच कोसळला. गोळीबाराचा आवाज ऐकून स्थानिक लोक धावून आले. गावकऱ्यांनी या तरुणाला तातडीने उपचारांसाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलवलं आहे.

advertisement

गोळीबार करणारे आरोपी जखमी तरुणाच्या परिचयाचे असण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे गावात आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस घटनास्थळी कढोली गावात दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडण्याचं धाडस केलं अन् सुरू केलं केक शॉप, आज मनाली वर्षाला कमावते 24 लाख!
सर्व पहा

या ३१ वर्षीय तरुणावर कुणी गोळीबार केला, गोळीबारामागील नेमकं कारण काय होतं, याचा कसून तपास करत आहेत. रथोत्सवाच्या तोंडावर झालेला हा प्रकार गंभीर असल्याने पोलीस अधिक तपास करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon: घराजवळ तो उभा होता अन् लपून त्याच्यावर झाडली गोळी, जळगावमधील घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल