पीडितेने तक्रारीत काय म्हटले आहे?
मी अ.ब.क. वय (24 वर्षे) व्यवसाय-शिक्षण, रा. शिर्डी ता. राहाता जि. अहिल्यानगर. समक्ष पोलीस स्टेशनमध्ये हजर होऊन तक्रार लिहून देते की, मी वरील ठिकाणी माझे कुटूंबासह राहते. सुमारे 3 वर्षापुर्वी मी नाशिक येथे ओकस प्रॉपर्टीज मध्ये व्हीजीटींग म्हणून जात होते. तेथे निरज जाधव ऑफीस बॉय म्हणून काम करत होता. गेल्या 15 ते 20 दिवसांपुर्वी मला निरज जाधव याने वॉटस अप वर माझा ए.आय. जनरेटेड एक अश्लिल फोटो पाठवला व असे फोटो त्याच्याकडे आहेत ते तो व्हायरल करणार आहे असा मेसेज केला, सदर फोटोचा मी स्क्रीन शॉट काढून ठेवला, थोड्या वेळात निरज याने ते मेसेज व फोटो डिलीट केले. मी खूप घाबरली होती, काय करावे सुचत नव्हते, भीतीपोटी मी हे घरच्यांना पण सांगतिलेले नाही.
advertisement
7 दिवसांपुर्वी गुरुवारी एक अनोळखी व्यक्ती मला श्री साई बाबा मंदिर जवळ गेट नं.4 समोर गर्दीत भेटला व तो मला म्हणाला की, निरज जाधवकडे तुझे अश्लील फोटो आहेत, ते आम्ही व्हायरल करणार आहे, असे बोलून तो गर्दीत निघून गेला त्यामुळे मी त्याला पाहू शकले नाही. त्यावरून माझी खात्री झाली आहे की, निरज जाधव हा ओकस प्रॉपर्टीजमध्ये कामाला होता. त्याने माझा फोटो वापरून एआय जनरेटेड किंवा मॉफींग करून अश्लील फोटो तयार केलेला आहे अशी माझी खात्री झाली आहे. त्याने मला पाठवलेला फोटो प्रिंट मी सोबत हजर करत आहे.
तरी 3 वर्षापूर्वी मी नाशिक येथे ओकस प्रॉपर्टीज येथे व्हीजीटला जात होते. त्यावेळी तेथे ऑफिस बॉय म्हणून म्हणून काम करणारा नीरज जाधव रा. नाशिक याने माझा फोटो वापरून एडिट करून अश्लील फोटो बनवून तो मला १५ ते २० दिवसांपूर्वी पाठवून तो व्हायरल करण्याची धमकी देत आहे. तसेच सदरचा अश्लील फोटो त्याने काही लोकांना पाठवला देखील केलेला आहे. म्हणून माझी नीरज जाधव आणि इतर यांचे विरुद्ध तक्रार आहे. माझी वरील तक्रार माझे सांगणे प्रमाणे टंकलिखीत केलेली असून त्याची प्रिंट काढल्यावर मी ती वाचली. ती बरोबर आणि खरी असल्याची खात्री झाल्यावर स्वाक्षरी केली आहे.
