TRENDING:

बड्या बेड्या नेत्यांचा गुरू 'कॅप्टन खरात'वर कोणकोणते गुन्हे? पोलिसांच्या FIR मध्ये काय म्हटलंय?

Last Updated:

लोकांची कुंडली सांगणाऱ्या कॅप्टन खरात याच्या काळ्या कारनाम्यांची अख्खी कुंडलीच पोलिसांच्या हाती लागली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : नाशिकच्या विकृत भोंदूच्या काळ्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरून गेलाय. बड्या बेड्या नेत्यांचा गुरु असलेल्या कॅप्टन अशोक खरातच्या अनेक कारनाम्यांचा भांडाफोड होतोय. लोकांची कुंडली सांगणाऱ्या कॅप्टन खरात याच्या काळ्या कारनाम्यांची अख्खी कुंडलीच पोलिसांच्या हाती लागलीय. अशोक खरात प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात खरातची 2 तास कसून चौकशी करण्यात आली. त्याच्याकडे असलेल्या पॅनड्राईव्हबाबतही त्यांनी विचारपूस केल्याचे कळते.
अशोक खरात
अशोक खरात
advertisement

अशोक खरातच्या विरोधात यापूर्वीच लूकआऊट नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. शिर्डी पोलिसांनी या प्रकरणाचा सुगावा लागल्यानंतर अशोक खरातवर आठ दिवस पाळत ठेवली होती अशी माहितीही मिळतीये. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून आता कसून तपास सुरू आहे.

आरोपी अशोक खरातवर कोणकोणते गुन्हे?

B.N.S. कलम - 64(1),74,352,351(1) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 कलम 3(1),3(2)

advertisement

गुन्हा घडला दिनांक- 01/11/2022 ते 17/12/2025 दरम्यान

गुन्हा दाखल दिनांक 17/03/2026 स्टेशन डायरी नंबर 31/2026

घटनास्थळ- ओकस प्रॉपर्टीज, कॅनडा कॉर्नर, नाशिक

आरोपी - अशोक कुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन, वय 67 वर्षे, राहणार फ्लॅट नंबर 37, तृप्त बाला, सर्व्हे नंबर 777/2/1, कर्मयोगी नगर, तिडके कॉलनी, गोविंद नगर लिंक रोड, नाशिक

advertisement

पोलिसांच्या FIR मध्ये काय म्हटलंय?

गुन्ह्याचा प्रकार- माहे नोव्हेंबर 2022 ते माहे डिसेंबर 2025 या कालावधीत ओकस प्रॉपर्टीज, कॅनडा कॉर्नर, नाशिक या ठिकाणी अशोक कुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन या भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिक बाबांनी स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र तंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखालील फिर्यादी यांच्या मनात विश्वास निर्माण करून त्याचे वरील ऑफिसचे ठिकाणी बोलावून फिर्यादी यांचा धार्मिक विश्वासाचा फायदा घेऊन गुंगीकारक पदार्थ खायला आणि पाणी पिण्यास देऊन फिर्यादीस संमोहित करून आणि त्यानंतर फिर्यादीचे आयुष्य बरबाद करून टाकेन अशी धमकी देऊन फिर्यादीच्या पतीच्या मरणाची भीती घालून फिर्यादीची इच्छा नसताना फिर्यादीवर वारंवार बलात्कार केले म्हणून फिर्यादीची अशोक कुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन राहणार फ्लॅट नंबर 37 तृप्त बाला, सर्व्हे नंबर 777/2/1, कर्मयोगी नगर, तिडके कॉलनी, गोविंद नगर लिंक रोड नाशिक या भोंदू बाबा विरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे.

advertisement

तपासी अधिकारी- पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे नेमणूक (गुन्हे युनिट 01)

भेट देणारे अधिकारी व अंमलदार यांचे नाव - पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
4 तासांचा कॅफे, नोकरी सांभाळत करतात व्यवसाय, दोन इंजिनिअर मित्रांची कहाणी, Video
सर्व पहा

दाखल करणारे अंमलदार/अधिकारी- पोलीस हवा/446 गायकवाड

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बड्या बेड्या नेत्यांचा गुरू 'कॅप्टन खरात'वर कोणकोणते गुन्हे? पोलिसांच्या FIR मध्ये काय म्हटलंय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल