TRENDING:

पुण्यात भीषण अपघात, पुलावरून थेट नाल्यात कोसळली कार, आतमध्ये लाखोंची रक्कम

Last Updated:

Accident in Pune: पुणे शहरात माणुसकी आणि धैर्याचे दर्शन घडवणारी एक घटना समोर आली आहे. पुण्यातील वानवडी परिसरात एका भीषण अपघातात कार थेट नाल्यात कोसळली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: पुणे शहरात माणुसकी आणि धैर्याचे दर्शन घडवणारी एक घटना समोर आली आहे. पुण्यातील वानवडी परिसरात एका भीषण अपघातात कार थेट नाल्यात कोसळली. मात्र, लष्करी अधिकारी नायर आशिष कुमार यादव यांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे चालकाचे प्राण वाचले आहेत. केवळ जीवच वाचवला नाही, तर कारमधील लाखो रुपयांची रोकडही त्यांनी सुरक्षितपणे वाचवली आहे.
News18
News18
advertisement

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, वानवडी परिसरातील गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळ भैरोबा नाल्यावरील पुलावर काल सकाळी १० च्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक चारचाकी गाडी थेट पुलावरून खाली नाल्यात कोसळली. या अपघातात वाहनाचं पूर्णपणे नुकसान झालं होतं आणि चालक आतमध्ये अडकून पडला होता.

त्याच वेळी लष्करी अधिकारी आशिष कुमार यादव हे पुलावरून जात होते. रस्त्यावर झालेली गर्दी पाहून त्यांनी गाडी थांबवली. विचारपूस केल्यावर खाली नाल्यात कार पडल्याचे त्यांना समजले. गाडीमध्ये काही हालचाल होत असल्याचे लक्षात येताच, आत कुणीतरी अडकले असावं या खात्रीने त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ते नाल्यात उतरले.

advertisement

कारमध्ये चालक बेशुद्ध अवस्थेत होता आणि त्याच्या नाकातून प्रचंड रक्तस्राव होत होता. यादव यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने गाडीची काच फोडली आणि जखमी चालकाला बाहेर काढले. लष्करातील आपल्या प्रशिक्षणाचा वापर करत यादव यांनी तातडीने स्वतःच्या रुमालाने चालकाच्या नाकावर दाब देऊन रक्तस्राव रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच गंभीर जखमी चालकाला नाल्याबाहेर काढून उपचारासाठी पाठवण्याची व्यवस्था केली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात तेजी, तुरीने ओलांडला 9 हजाराचा टप्पा, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

विशेष म्हणजे, त्या अपघातग्रस्त कारमध्ये १ ते १.५ लाख रुपयांची रोकड होती. चालक शुद्धीवर आल्यानंतर यादव यांनी ती संपूर्ण रक्कम सुरक्षितपणे त्याच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर एका टेम्पोच्या मदतीने जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. लष्करी अधिकाऱ्याने दाखवलेल्या या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुण्यात भीषण अपघात, पुलावरून थेट नाल्यात कोसळली कार, आतमध्ये लाखोंची रक्कम
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल