TRENDING:

LPG Gas :...तर तुम्हाला मिळणारा LPG गॅस बंद होणार! केंद्र सरकार अॅक्शन मोडवर, थेट आदेशच काढला

Last Updated:

LPG Gas : देशात गॅस वितरण व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि एकाच इंधनावर असलेले अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : देशात गॅस वितरण व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि एकाच इंधनावर असलेले अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
PNG LPG Gas
PNG LPG Gas
advertisement

तर LPG गॅस थांबवला जाणार

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय यांनी जारी केलेल्या नव्या आदेशानुसार, ज्या भागात पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) सुविधा उपलब्ध आहे, तेथे ग्राहकांनी ती न घेतल्यास घरगुती एलपीजी (LPG) गॅसचा पुरवठा थांबवला जाणार आहे.

नवीन आदेश 2026 अधिसूचित

सरकारने ‘नैसर्गिक वायू आणि इतर पेट्रोलियम उत्पादने वितरण (पाइपलाइन टाकणे, बांधकाम, कार्यान्वयन आणि विस्तार) आदेश, 2026 लागू केला आहे. या आदेशाचा उद्देश देशभरात गॅस पाइपलाइन नेटवर्कचा विस्तार करणे आणि पर्यावरणपूरक इंधनाचा वापर वाढवणे हा असणार आहे.

advertisement

या निर्णयामुळे शहरांमध्ये PNG वापराला चालना मिळणार असून, एलपीजीवरील दबावही कमी होण्याची अपेक्षा आहे.

इंधन पुरवठा पूर्णपणे सुरळीत

दरम्यान, देशात पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीचा कोणताही तुटवडा नसल्याचे सरकारी तेल कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. Indian Oil Corporation ने सर्व पेट्रोल पंपांवर पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले आहे.

तसेच Bharat Petroleum (BPCL) ने इंधन टंचाईच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचे म्हटले आहे, तर Hindustan Petroleum (HPCL) नेही देशभरात इंधन पुरवठा सुरळीत असल्याची खात्री दिली आहे.

advertisement

नागरिकांना अफवांपासून सावध राहण्याचा सल्ला

सरकारने नागरिकांना इंधन तुटवड्याबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. सर्वत्र पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी सुरळीत सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

हॉटेल-रेस्तरांसाठीही सूचना

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, दरात झाली वाढ, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान, Central Consumer Protection Authority (CCPA) ने हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायिकांना ग्राहकांकडून ‘एलपीजी शुल्क’ आकारू नये, असा इशारा दिला आहे. ‘इंधन खर्च वसुली’ किंवा तत्सम अतिरिक्त शुल्क लावणे अन्यायकारक असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
LPG Gas :...तर तुम्हाला मिळणारा LPG गॅस बंद होणार! केंद्र सरकार अॅक्शन मोडवर, थेट आदेशच काढला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल