हैदर शेख, प्रतिनिधी
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दहीहंडीच्या दिवशी पोहायला गेलेल्या दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुलांच्या मृत्युमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार, ही दोन मुलं पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरली होती. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. पोलिसांच्या मदतीने दोन्ही मुलांचं मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. घटनास्थळी पालकांनी एकच आक्रोश केला. या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून घटनेला पोलीस सखोल तपास करत आहे.
शाळेला सुट्टी असल्याने गेले पोहायला
सिंदेवाही तालुक्यातल्या टेकरी नदीत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार दुपारी घडली. जित वाकडे , आयुष गोपाले अशी मृत मुलांची नावे आहेत. आज शाळेला सुट्टी असल्याने नदीवर पोहण्यासाठी सिंदेवाही येथील काही मुले टेकरी गावाजवळील नदी घाटावर पोहण्यासाठी गेली होती. याच वेळी दोघांचा नदीच्या पाण्यात बूडून मृत्यू झाला.
दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा
घटनेची माहिती प्राप्त होताच सिंदेवाही पोलीसांनी मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात हलविले. या घटनेने वाकडे आणि गोपाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात दुर्दैवी घटनेमुळे शोक व्यक्त केला जात आहे. घटनेचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.
नांदेडमध्ये बसचा चालक वाहून गेला
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. तालुक्यात नदी नाल्यांना पूर आला असून बोधडी ते सिंदगी रस्त्यावर शाळेची रिकामी बस पुराच्या पाण्यात अडकली. पाण्याचा जोर वाढल्याने काही अंतरापर्यंत ही स्कूल बस वाहून गेली , नंतर एका ठिकाणी अडकली. बसमध्ये चालकाशिवाय कोणी नव्हते. दरम्यान बसचा चालक बेपत्ता असुन त्याचा शोध सुरू आहे . कोठारी नदीला देखील पुर आला .. या पुराचे पाणी शेतात शिरले. परिसरातील शेती जलमय झाली ..