खरं तर सध्या राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली सूरू आहेत. 5 डिसेंबरला महायुतीचा शपथविधी मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. पण त्याआधीच नाशिकमध्ये पालकमंत्री पदावरून बॅनरबाजी सूरू झाली आहे.महायुतीच्या तीनही उमेदवारांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.या बॅनरबाजीमुळे सुहास कांदे यांनी भुजबळांमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून पुन्हा एकदा भुजबळ आणि कांदे आमने-सामने येण्याची शक्यता आहे. कारण छगन भुजबळ समर्थकांकडून भुजबळांचा भावी पालकमंत्री म्हणून उल्लेख असलेला बॅनर लावण्यात आला आहे. त्याचसोबत सुहास कांदे यांच्या समर्थकांकडूनही नाशिकमध्ये सुहास कांदेचे पालकमंत्री म्हणून बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे आता समीर भुजबळांच्या पराभवानंतर कांदे यांच नेक्ट टार्गेट छगन भुजबळ आहेत ? त्यामुळे भुजबळांना शह देण्यासाठी थेट कांदे समर्थकांनी पालकमंत्री पदावर दावा केला आहे.त्यामुळे आता नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री पदावरून कांदे आणि भुजबळ यांच्यात पुन्हा संघर्ष पाहायला मिळायची शक्यता आहे.
advertisement
दरम्यान नाशिक मध्य विधानसभा मतदार संघाच्या आमदार देवयानी फरांदे यांचे देखील भावी पालकमंत्री असे बॅनर दिसून आले आहेत. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादा भुसे यांचे नाव चर्चेत असतानाच देवयानी फरांदे यांचे बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात संघर्ष पेटणार आहे.
