नेमकं काय म्हणाले दानवे?
'दिल्लीतून महाराष्ट्रात नेत्यांच्या फौजा पाठवायच्या तुम्ही, अन औरंगजेबाचे नाव आम्हाला, वा रे वा? विरोधकांशी तुमचे असलेले बोलणे, वागणे, राजकीय दबाव टाकणे ही औरंगजेबी वृत्ती आज कोण पोसते आहे हे देश बघतो आहे.. देशाच्या 'उद्योग पळवे' गँगचे व्हाईस कॅप्टन महाराष्ट्रात आले होते, इथल्या मातीची, लोकांसाठी झगडणाऱ्या माणसांना काही तरी नावं ठेवायचे, घालून पाडून बोलायचे हा यांचा रटाळ अजेंडा लोकसभेत आपटी खाऊनही कायम आहे. राहिला प्रश्न संभाजीनगरचा.. बेगडी समर्थकांनी जे २०१४-१९ दरम्यान केले नाही, ते आम्ही केले. ती चिकलठाणा विमानतळाच्या नावाची फाईल तुमच्या टेबलावर धूळखात पडली आहे.. तेवढं होतं का बघा!' असा हल्लाबोल दानवे यांनी अमित शाह यांच्यावर केला आहे.
advertisement
अमित शाह यांचा हल्लाबोल
अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. 'औरंगजेब फॅन क्बल कोण आहे? आघाडीवाले. उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते बनले आहेत. स्वत:ला बाळासाहेबांचा वारस सांगणारे कसाबला बिर्याणी खायला घालणाऱ्यांसोबत बसले. याकुबला सोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांसोबत बसला आहात. झाकिर नाईकला मेसेंजर ऑफ पीस बनवणाऱ्यांसोबत बसला आहात. पीएफआयला सपोर्ट करणाऱ्यांसोबत बसला आहात. संभाजीनगरला विरोध करणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे तुम्ही बसला आहात, तुम्हाला लाज वाटली पाहिजे' अशा शब्दात अमित शहांनी ठाकरेंवर निशाणा साधला.