TRENDING:

Sambhajinagar Crime : 58 वर्षाच्या PSI चा पुण्यातील 23 वर्षाच्या तरुणीवर अत्याचार, वारंवार लॉजवर घेऊन जायचा! तीन वेळा गर्भपात केला अन्...

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar PSI Assault girl : आरोपीने पीडितेचा विश्वास संपादन करण्यासाठी "नंबर कन्फर्म करायचा आहे" अशी थाप मारून तिचा फोन नंबर मिळवला आणि त्यानंतर सतत संपर्कात राहून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
PSI assaults 23 Years Old girl : पोलिसांना समाजाचा रक्षक म्हटलं जातं पण रक्षकच भक्षक झाला तर समाज विघटनाच्या वाटेवर जातो. याची प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून खाकी वर्दीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईल हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या २३ वर्षीय तरुणीवर चक्क एका 58 वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाने (PSI) अत्याचार केल्याचा खळबळजनक आरोप झाला आहे. मदतीचा बहाणा करून आणि लग्नाचे खोटे आमिष दाखवून पीडितेचे शारीरिक शोषण केल्याचे समोर आले असून, या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात संबंधित अधिकारी, त्याची पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar 23 Years Old girl Assaulted By psi
Chhatrapati Sambhajinagar 23 Years Old girl Assaulted By psi
advertisement

मूळची नांदेडची, पुण्यात खासगी नोकरी

या प्रकरणातील पीडित तरुणी मूळची नांदेडची असून ती पुण्यात खासगी नोकरी करते. 7 मार्च 2025 रोजी ती मोबाईल हरवल्याची तक्रार देण्यासाठी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गेली होती. तिथे तिची ओळख पीएसआय सुभाष चव्हाण याच्याशी झाली. आरोपीने पीडितेचा विश्वास संपादन करण्यासाठी "नंबर कन्फर्म करायचा आहे" अशी थाप मारून तिचा फोन नंबर मिळवला आणि त्यानंतर सतत संपर्कात राहून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

advertisement

पीडित तरुणी तीन वेळा गर्भवती राहिली

आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून विविध लॉजवर नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. इतकंच नाही तर, बनावट मंगळसूत्र बांधून ती आपली पत्नी असल्याचे नाटकही त्याने केलं. या काळात पीडित तरुणी तीन वेळा गर्भवती राहिली होती, मात्र तिची इच्छा नसतानाही पुणे आणि संभाजीनगर येथे तिचा जबरदस्तीने तीनवेळा गर्भपात घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ही क्रूरता केवळ शारीरिक शोषणापुरती मर्यादित राहिली नाही.

advertisement

लग्नासाठी तगादा लावला अन्...

जेव्हा पीडितेने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा आरोपी चव्हाण याने तिला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणाची माहिती मिळताच आरोपीची पत्नी नर्मदा आणि मुलगा सागर यांनीही पीडितेला मारहाण करून धमकावले. 28 जानेवारी रोजी आरोपीच्या पत्नीने आणि मुलाने केलेल्या मारहाणीमुळे पीडितेचा दीड महिन्याचा गर्भपात झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या कौटुंबिक छळामुळे पीडितेचे मानसिक आरोग्य पूर्णपणे कोलमडले होते.

advertisement

पोलिसांत धाव घेतली आणि...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सेंद्रिय भाजीपाला- फळे खरेदी करताय? खरा कसा ओळखायचा? सोप्या टिप्सचा Video
सर्व पहा

दरम्यान, या प्रकरणातील पीडितेने अखेर हिंमत एकवटून पोलिसांत धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार कथन केला. पोलीस उपनिरीक्षक सुभाष चव्हाण याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Sambhajinagar Crime : 58 वर्षाच्या PSI चा पुण्यातील 23 वर्षाच्या तरुणीवर अत्याचार, वारंवार लॉजवर घेऊन जायचा! तीन वेळा गर्भपात केला अन्...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल