TRENDING:

मी बिन लग्नाचा! 57 वर्षीय व्यापाऱ्याचं भयंकर कांड, 29 वर्षीय महिलेसोबत..., छ. संभाजीनगरच्या घटनेनं खळबळ

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: मित्रांनी एका मौलानाला घरी बोलावले. निकाह वाचून दाखवण्यात आला आणि मुस्लिम रिवाजानुसार निकाह झाल्याचे सांगितले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर: एका कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या 29 वर्षीय महिलेसोबत भयंकर घडलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका 57 वर्षीय व्यापाऱ्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले. या प्रकरणी व्यापारी मिर्झा इरफान बेग अहमद बेग याला सिटीचौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष न्यायालयाने त्याला 4 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मी बिन लग्नाचा! 57 वर्षीय व्यापाऱ्याचं भयंकर कांड, 29 वर्षीय महिलेसोबत..., छ. संभाजीनगरच्या घटनेनं खळबळ
मी बिन लग्नाचा! 57 वर्षीय व्यापाऱ्याचं भयंकर कांड, 29 वर्षीय महिलेसोबत..., छ. संभाजीनगरच्या घटनेनं खळबळ
advertisement

नेमकं घडलं काय?

पीडित महिला ही शहाबाजार परिसरात एका कपड्यांच्या दुकानात काम करते. तेव्हा तिची आरोपी व्यापाऱ्यासोबत ओळख झाली. पुढे मिर्झा इरफान बेग अहमद बेग याने आपण अविवाहित असल्याचे सांगत तिच्याशी जवळीक वाढवली. 16 मे 2023 रोजी परफ्युम घेण्याच्या बहाण्याने पीडितेला शोरूममध्ये नेले आणि दरवाजा लॉक करून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत सहा महिन्यांच्या कालावधीत अनेक वेळा अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

advertisement

दुचाकीच्या चाकात चिखल अडकला, हेडफोननं घात केला, बाप-लेकीसोबत भयंकर घडलं, छ. संभाजीनगर हळहळलं

दोघे एकत्र राहू लागले

मिर्झा इरफान बेग याने भाड्याने घर घेतले आणि तो पीडितेसोबत राहू लागला. त्याच काळात त्याच्या मित्रांनी एका मौलानाला घरी बोलावले. निकाह वाचून दाखवण्यात आला आणि मुस्लिम रिवाजानुसार निकाह झाल्याचे सांगितले. मात्र, आरोपी हा आधीपासूनच विवाहित असून त्याला मुले असल्याचे समजले. त्यामुळे दोघांमध्ये वाद वाढत गेला.

advertisement

वेगळे राहिल्यानंतर देखील.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
जोतिबाच्या नावानं चांगभल! गुलालाने माखलेला खोबऱ्याचा तुकडा, त्यावरच साकारला दख्खनचा राजा, Video
सर्व पहा

आरोपीचं पहिलं लग्न झाल्याचं समजल्यावर दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे महिला वेगळी राहू लागली. तरीही आरोपीने तिच्या घरी जाऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. विशेषत: मार्च 2026 मध्ये पुन्हा अत्याचार केले. त्यानंतर पीडितेने सिटीचौक पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल होताच आरोपी मिर्झा बेग याला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मी बिन लग्नाचा! 57 वर्षीय व्यापाऱ्याचं भयंकर कांड, 29 वर्षीय महिलेसोबत..., छ. संभाजीनगरच्या घटनेनं खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल