सागर प्रकाश सरदार (रा. सुदर्शन सोसायटी, एमआयडीसी क्वार्टर, आयटीआय कॉलेजच्या पाठीमागे) असे व्यावसायिकाचे नाव आहे. 18 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता एका व्यक्तीने वास्तुशांतीसाठी केटरिंगची ऑर्डर द्यायची असल्याचे सांगून सातारा परिसरातील प्रभू हॉटेलच्या पाठीमागे बोलावले. तेथे चौघेजण होते. त्यांनी अचानक डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि लाकडी दांडा तसेच लोखंडी रॉडने हल्ला केला, असे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.
advertisement
YouTube वर पाहिलं अन्..., वॉर्डबॉयचं भयंकर कांड, संभाजीनगरच्या 'त्या' प्रकरणात मोठी कारवाई
सरदार यांच्या दोन्ही पायांवर बेदम मारहाण करत त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. यानंतर आरोपींनी त्यांच्या कानातील सुमारे 20 हजार रुपयांच्या बाळ्या, 10 हजार रुपयांचा मोबाईल आणि 55 हजार 900 रुपये रोख रक्कम असा एकूण 85 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल लुटून फरार झाले. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दिलीप बचाटे करत आहेत.






