advertisement

केटरिंगची ऑर्डर द्यायला बोलावलं, डोळ्यात मिरची पावडर टाकली अन्...., छ. संभाजीनगरमध्ये भंयकर प्रकार

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: एका व्यक्तीने वास्तुशांतीसाठी केटरिंगची ऑर्डर द्यायची असल्याचे सांगून सातारा परिसरातील प्रभू हॉटेलच्या पाठीमागे बोलावले.

केटरिंगची ऑर्डर द्यायला बोलावलं, डोळ्यात मिरची पावडर टाकली अन्...., छ. संभाजीनगरमध्ये भंयकर प्रकार
केटरिंगची ऑर्डर द्यायला बोलावलं, डोळ्यात मिरची पावडर टाकली अन्...., छ. संभाजीनगरमध्ये भंयकर प्रकार
छत्रपती संभाजीनगर : वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी केटरिंगची ऑर्डर देण्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाला बोलावून घेतले. तसेच अचानक हल्ला करून चौघांनी त्याला लुटले. ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सागर प्रकाश सरदार (रा. सुदर्शन सोसायटी, एमआयडीसी क्वार्टर, आयटीआय कॉलेजच्या पाठीमागे) असे व्यावसायिकाचे नाव आहे. 18 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता एका व्यक्तीने वास्तुशांतीसाठी केटरिंगची ऑर्डर द्यायची असल्याचे सांगून सातारा परिसरातील प्रभू हॉटेलच्या पाठीमागे बोलावले. तेथे चौघेजण होते. त्यांनी अचानक डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि लाकडी दांडा तसेच लोखंडी रॉडने हल्ला केला, असे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.
advertisement
सरदार यांच्या दोन्ही पायांवर बेदम मारहाण करत त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. यानंतर आरोपींनी त्यांच्या कानातील सुमारे 20 हजार रुपयांच्या बाळ्या, 10 हजार रुपयांचा मोबाईल आणि 55 हजार 900 रुपये रोख रक्कम असा एकूण 85 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल लुटून फरार झाले. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दिलीप बचाटे करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
केटरिंगची ऑर्डर द्यायला बोलावलं, डोळ्यात मिरची पावडर टाकली अन्...., छ. संभाजीनगरमध्ये भंयकर प्रकार
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement