विजय कृष्णा उगले (24) हे आपल्या भावासोबत राहतात. त्यांच्या ओळखीचा अविनाश जाधव हा मागील काही महिन्यांपासून रात्री त्यांच्या घरी झोपण्यासाठी येत होता. मात्र 16 मार्च रोजी रात्री उशिरा अविनाश दारूच्या नशेत घरी आला. तेव्हा विजयने त्याला पुन्हा घरी येऊ नको असे सांगितले. यावरून दोघांत वाद झाला.
advertisement
दरम्यान, दोघांत वाद झाल्यानंतर विजय उगले हा अविनाशच्या घरी जाऊन त्याच्या भावाला समज देत होता. तेव्हा अविनाश त्या ठिकाणी आला आणि हातातील लोखंडी रॉडने मारहाण सुरू केली. त्याने जबड्यावर आणि डोक्यावर मागून प्रहार केला. यामध्ये विजय गंभीर जखमी झाला. या जखमी अवस्थेतच त्याला घाटीत उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला दुखापत झाली असून सहा टाके घालण्यात आले.
याप्रकरणी विजयने बेगमपुरा पोलिसांत धाव घेतली. गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
