TRENDING:

संभाजीनगर हादरलं! गॅरेजवर बसले होते दोन तरुण, अचानक अज्ञातांकडून ॲसिड हल्ला

Last Updated:

छत्रपती संभाजीनगर शहरातील विष्णूनगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं दोन तरुणांवर अज्ञात इसमांनी ॲसिड हल्ला केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील विष्णूनगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं दोन तरुणांवर अज्ञात इसमांनी ॲसिड हल्ला केला आहे. दोन्ही तरुण एका गॅरेजवर बसले होते. याचवेळी पाठीमागून अचानक आलेल्या दोन अज्ञातांनी दोघांवर अॅसिड फेकलं. या भीषण हल्ल्यात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
News18
News18
advertisement

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, विष्णूनगर परिसरातील एका गॅरेजवर सिराज आणि वैभव हे दोन तरुण बसलेले होते. दुचाकीची दुरुस्ती सुरू असताना अचानक काही अज्ञात व्यक्ती त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी काहीही न बोलता या दोन्ही तरुणांच्या अंगावर थेट ॲसिड फेकले. हा हल्ला इतका अनपेक्षित होता की, तरुणांना स्वतःचा बचाव करण्याची संधीच मिळाली नाही.

advertisement

तरुण गंभीर जखमी, परिसरात दहशत

ॲसिड पडल्यामुळे सिराज आणि वैभव यांच्या शरीराचा काही भाग भाजला असून त्यांच्या चेहऱ्यावर आणि अंगावर गंभीर जखमा झाल्या आहेत. हल्ल्यानंतर परिसरात आरडाओरड झाल्याने नागरिक जमा झाले, मात्र तोपर्यंत आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. जखमी तरुणांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथं प्राथमिक उपचार केल्यानंतर तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.

advertisement

पोलिसांकडून तपास सुरू

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीत रमले नाही मन, तरुणाने सुरू केला भंगार गोळा करून व्यवसाय, 3 कोटी उलाढाल
सर्व पहा

घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. या कृत्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जुन्या वादातून हा हल्ला झाला की यामागे काही वेगळं कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत असून आरोपी कोणत्या दिशेला पळाले याचा माग काढला जात आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत. मात्र अशाप्रकारे दोन तरुणांनी काहीही न बोलता अॅसिड हल्ला केल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
संभाजीनगर हादरलं! गॅरेजवर बसले होते दोन तरुण, अचानक अज्ञातांकडून ॲसिड हल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल