नेमका प्रकार काय घडला?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा माणिकराव काळे (वय २५, राहणार शिवना) असं संशियत आरोपीचं नाव आहे. आरोपी कृष्णा काळे याने १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास पीडित तरुणीला तिच्या महाविद्यालयाच्या परिसरात गाठले. बोलत असताना त्याने तिला बळजबरीने आपल्या चारचाकी वाहनात बसण्यास सांगितले.
जेव्हा मुलीने विरोध केला, तेव्हा आरोपी कृष्णाने तिला "तुझ्या वडिलांचा बळी घेईन" अशी धमकी दिली. या धमकीमुळे घाबरलेल्या मुलीला त्याने वाहनात बसवले आणि फर्दापूर परिसरातील एका लॉजवर नेले. लॉजवर नेऊन पुन्हा जीवे मारण्याची धमकी देत कृष्णाने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. मुलीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने बळजबरी केली.
advertisement
घरी परतल्यावर उघड झाला प्रकार
महाविद्यालय सुटण्याच्या वेळेत आरोपीने पीडितेला पुन्हा महाविद्यालयाजवळ आणून सोडलं आणि तो फरार झाला. सायंकाळी पीडित मुलगी घरी परतल्यावर तिने आपल्या पालकांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीची ही हकिकत ऐकून पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. पालकांनी तत्काळ पीडित मुलीसह अजिंठा पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी कृष्णा काळेविरोधात तक्रार दाखल केली आरोपी सध्या फरार असून अजिंठा पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
