मिळालेल्या माहितीनुसार, हदगाव-नरवाडी मार्गावर नरवाडी शिवारातील नळकांडी पुलाजवळ काल सकाळी हा मृतदेह स्थानिकांना आढळला होता. परिसरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने नरवाडीचे सरपंच आसिफ पटेल आणि गौरव विधाटे यांनी तात्काळ गंगापूर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पोलिसांनी टेमकर यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला.
advertisement
मृत्यूचे कारण अस्पष्ट, घातपाताचा संशय?
गणेश टेमकर यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मृत्यू नैसर्गिक होता की त्यामागे अन्य काही कारण आहे? याबाबतचे गूढ कायम आहे. टेमकर हे राजकीयदृष्ट्या सक्रिय असल्याने, त्यांच्या अकस्मात मृत्यूमागे घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी सध्या या घटनेची अकस्मात मृत्यू (AD) म्हणून नोंद केली असून, तपास सुरू केला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येण्याची शक्यता आहे.
भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून गणेश टेमकर यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे भालगाव आणि गंगापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे. टेमकर यांच्या पश्चात त्यांचे आई-वडील, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
