छत्रपती संभाजीनगर : आपल्यापैकी अनेक जणांना घरामध्ये पाळीव प्राणी आणि पक्षी पाळायला खूप आवडतात. तसेच अनेक जणांनी घरामध्ये पाळीव प्राणी किंवा पक्षी पाळले असतीलच. काही जण घरांमध्ये पोपट, तसेच इतरही प्राणी आणि पक्षी पाळलेले असतील. मात्र, भारतीय प्राणी किंवा पक्षी घरामध्ये जर तुम्हाला पाळायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला परवानगी घ्यावी लागते. याबाबत अनेकांना माहिती नसेल. याचविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.
advertisement
मानव वन्यजीव संरक्षण डॉ. किशोर पाठक यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, आपल्यापैकी बऱ्याच जणांना पाळीव प्राणी आणि घरामध्ये पाळायला आवडत असतात. पण भारतीय कायद्यानुसार घरात भारतीय पक्षी आणि प्राणी पाळणे हा गुन्हा आहे.
जर तुम्ही घरामध्ये कुठलाही भारतीय पक्षी जर पाळला तरी तुम्हाला 25 हजार रुपये दंड आणि त्याचबरोबर तुरुंगातही जावे लागेल, अशी शिक्षा आहे. तसेच उंदीर, मासे, कासव, पोपट किंवा इतरही प्राणी तुम्ही आणि पक्षी घरात ठेवू शकत नाही. असे केल्यावरही शिक्षा होते.
लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच बॉयफ्रेंडसोबत पळून गेली तरुणी, नवरा होता झोपेत, घडलं भयानक कांड
त्यासोबतच काही जणांना विदेशी प्राणी आणि पक्षी घरात पळायला आवडतात. त्यामध्ये तुम्ही विदेशी पोपट, मासे, कासव हे जरी प्राणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये पाळायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला अगोदर वनविभागाची आणि त्यासोबतच महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते. यांची परवानगी भेटल्यानंतरच तुम्ही घरामध्ये हे सर्व प्राणी आणि पक्षी पाळू शकतात.
त्यामुळे जर तुम्हाला प्राणी किंवा पक्षी पाळायची आवड असेल तर त्या आधी तुम्हाला ही वनखात्याची आणि त्यासोबतच महानगरपालिकेची परवानगी घेऊनच घरामध्ये पाळावे. नाहीतर तुम्हाला शिक्षा होईल, अशी माहिती त्यांनी दिली.