मनोहर लिंबाजी चव्हाण असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एका तरुणीवर ३ वर्षे अशाप्रकारे अत्याचार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लग्नात झाली ओळख
पीडित तरुणी आणि आरोपी मनोहर चव्हाण यांची ओळख एका विवाह समारंभात झाली होती. या ओळखीचं रूपांतर प्रेमसंबंधात झालं. याच दरम्यान, आरोपीने तरुणीला लग्नाचं खोटे आश्वासन दिलं. या आश्वासनावर विश्वास ठेवून तरुणी त्याच्या जाळ्यात ओढली गेली.
advertisement
२०२२ ते २०२५ दरम्यान अत्याचार
तक्रारीनुसार, आरोपी मनोहर चव्हाण याने २०२२ पासून ते जून २०२५ या प्रदीर्घ कालावधीत तरुणीवर अनेकदा अत्याचार केले. मिल कॉर्नर, औरंगपुरा, रेल्वे स्टेशन परिसरातील लॉज तसेच अहमदपूर आदी विविध ठिकाणी त्याने हे गैरकृत्य केले.
नातेवाईकांकडून मारहाण आणि लग्नास नकार
२०२३ मध्ये पीडित तरुणी आरोपीच्या घरी लग्नाची विचारणा करण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपीच्या नातेवाइकांनी तिला मारहाण केली, असेही तरुणीने आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे. त्यावेळी आरोपीने लग्नास होकार देऊन वेळ मारून नेली. मात्र, त्यानंतर आरोपीने तरुणीसोबत लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला.
आपल्यावर झालेला अन्याय आणि फसवणूक लक्षात आल्यानंतर अखेर पीडित तरुणीने हिंमत दाखवून क्रांती चौक पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत आरोपी मनोहर लिंबाजी चव्हाण याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास क्रांती चौक पोलीस करत आहेत.
