TRENDING:

छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटवताना राडा, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या; नागरिकांकडून दगडफेक

Last Updated:

Chhatrapati Sambhaji Nagar : अतिक्रमण काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी विरोध केला. यावेळी नागरिकांकडून दगडफेकही करण्यात आली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, छत्रपती संभाजीनगर : विश्रांतनगर भागातील अतिक्रमण काढत असताना मोठा राडा झाला आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासन मोठ्या फौजफाट्यासह अतिक्रमण काढण्यासाठी दाखल झाले. मात्र अतिक्रमण काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी विरोध केला. यावेळी नागरिकांकडून दगडफेकही करण्यात आली. शेवटी पोलीसांनी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्जही केला.
News18
News18
advertisement

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar News In Marathi) शहरात मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांत नगर येथे अनाधिकृत अतिक्रमण करण्यात आले होते. ते काढण्यासाठी महापालिका प्रशासन पोलीसांच्या मोठ्या फौज फाट्यासह दाखल झाले. तेव्हा स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध करत रस्त्यावरच ठिय्या केला. यावेळी महिला मोठ्या संख्येने या विरोधात उतरले असून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

advertisement

अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांसह 5 ते 6 जेसीबी, अग्निशामक दलाच्या गाड्या सोबतच पोलीस प्रशासनाने देखील दंगल नियंत्रण पथक यांच्यासह मोठा फौज घटनास्थळावर तैनात केला. दरम्यान यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी हे देखील घटनास्थळावर उपस्थित आहे. पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिक नागरिकांनी दगडफेक केली.

advertisement

अतिक्रमण हटवत असताना नागरिकांकडून दगडफेक केली गेली. यावेळी नागरिक आणि पोलीस आमने सामने आले होते. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यावेळी काही नागरिकांनी आपल्या पत्र्याच्या शेडला आगही लावली. दगडफेकीच्या घटनेनंतर पोलीसांचा कडेकोट फौजफाटा तैनात केला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महिलांनो व्यवसाय सुरू करायचाय? पुण्यात इथं मिळतंय मोफत मार्गदर्शन, Video
सर्व पहा

विश्रांतनगर परिसरात नव्या रस्त्याचं काम केलं जाणार आहे. पण या भागात रस्त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले गेले होते. या अतिक्रमणामुळे रस्त्याचे काम रखडले होते. शेवटी महापालिकेकडून कारवाई करत अतिक्रमण हटवण्यात आले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटवताना राडा, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या; नागरिकांकडून दगडफेक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल