तीव्र दुर्गंधीमुळे घटना उघडकीस
विद्यापीठ परिसरात गेल्या काही दिवसांपासून तीव्र दुर्गंधी येत असल्याची माहिती सुरक्षा रक्षकांनी दिली होती. दुर्गंधीचा स्रोत शोधण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी विहिरीच्या दिशेने पाहणी केली असता, त्यांना विहिरीच्या पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसला. मृतदेह पाहताच त्यांनी तातडीने बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांना घटनेची माहिती दिली.
advertisement
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जगताप पोलीस पथकांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच, मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यासाठी पदमपुरा अग्निशमन दलाचे पथकही बोलावण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर विहिरीतील मृतदेह बाहेर काढला आणि तो पोलिसांच्या ताब्यात दिला.
आत्महत्या की घातपात?
सध्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मृत व्यक्ती कोण आहे, तो विद्यापीठाचा विद्यार्थी आहे की बाहेरील व्यक्ती, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी या घटनेची प्राथमिक तपासणी सुरू केली असून, हे प्रकरण आत्महत्या आहे की त्यामागे घातपात आहे, या दोन्ही शक्यतांच्या दिशेने तपास केला जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
