नागरिकांच्या म्हणण्यानुसार अतिक्रमण काढण्यासाठीची कोणतीही नोटीस प्रशासनाने आम्हाला दिलेली नव्हती. यावेळी नागरिक आणि प्रशासनामध्ये जोरदार संघर्ष झाला. आम्ही एक दोन तास तुम्हाला देतो परंतु त्यानंतर आम्ही कारवाईला सुरुवात करू, असे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यानंतर कारवाईला सुरुवात झाल्यानंतर नागरिकांनी पुन्हा विरोधाला सुरुवात केली. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त होता. पोलिसांनी काहीसा सौम्य चाठीचार्ज केला.
advertisement
महापालिका प्रशासन आणि नागरिकांमध्ये बराच वेळ संघर्ष झाल्यानंतर नागरिकांची गर्दी ओसरली. अतिक्रमण काढू देण्याची नागरिकांची मानसिकता झाली. अखेर मोठ्या विरोधानंतर महापालिका प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
August 04, 2025 4:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नारेगाव अतिक्रमण कारवाईवेळी मोठा राडा, प्रशासन आणि नागरिकांमध्ये संघर्ष, पोलिसांकडून लाठीचार्ज
