याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मूळची गंगापूर तालुक्यातील आहे. ती सध्याच 16 वर्षांची असून इयत्ता अकरावीत शिकते. पीडितेच्या आई-वडिलांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्यं आहेत. तिचे वडील वाहनचालक असून आई गृहिणी आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचं कारण पुढे करून तिच्या नातेवाईकांनी तिचं लग्न लावून देण्याची जबाबदारी घेतली होती.
advertisement
Rain Update: छ. संभाजीनगरच्या कन्नड, सिल्लोड अन् पैठणला अतिवृष्टीचा तडाखा; शेतकरी हवालदिल, Photo
नातेवाईकांनी पीडितेसाठी एका मंडप व्यावसायिकाचं स्थळ आणलं होतं. आई-वडिलांनी देखील जबाबदारीतून मोकळं होण्याच्या उद्देशाने मुलींचं लग्न लावण्यास होकार दिला. 15 सप्टेंबर (सोमवार) रोजी लग्नाचा घाट घातला गेला. मात्र, ग्रामीण भरोसा सेलच्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांना या बालविवाहाबाबत माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ बालकल्याण अधिकारी आम्रपाली बोर्डे, नितेश धुर्वे, उपनिरीक्षक स्वप्निल नरवडे, अंमलदार कपिल बनकर, इर्शाद पठाण, भाग्यश्री चव्हाण यांच्यासोबत विवाहस्थळी धाव घेतली.
पोलीस विवाहस्थळी पोहोचले तेव्हा लग्नाची सर्व तयारी झाली होती. मात्र, अक्षदा पडण्याआधीच पोलिसांनी हस्तक्षेप करून लग्न थांबवलं. पोलिसांनी विचारणा केली असता कुटुंबाने उडवाउडवीची उत्तरं दिली. सध्या सारखपुडा करत असून लग्ननंतर करणार असल्याचा दावा करण्यात आला.
मात्र, सर्व तयारी बघात लग्नाचा घाट घातला गेला होता, हे पोलिसांच्या निदर्शनास आलं. मुलीची कागदपत्रं तपासली असता ती अल्पवयीन असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर कुटुंबाने माफी मागून अल्पवयीन मुलींच लग्न न लावण्याचं हमीपत्र पोलिसांना लिहून दिलं. त्यांना बालकल्याण समितीसमोर हजर राहण्याची नोटीस बजावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.