TRENDING:

पोलिसांनी रिक्षा अडवली, आत पाहताच उडाला थरकाप, सावत्र आई-वडिलांच्या कृत्याने संभाजीनगर हादरलं!

Last Updated:

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वाळूज महानगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वाळूज महानगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं पोलिसांनी गस्त घालत असताना एका रिक्षाची तपासणी केली. यावेळी रिक्षामधील दृश्य बघून पोलीस पथकाचा देखील थरकाप उडाला आहे. रिक्षात एका २० वर्षीय तरुणीचा गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. हा प्रकार उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून पुढील तपास केला जात आहे.
AI generated Photo
AI generated Photo
advertisement

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरात उघडकीस आली आहे. येथील तिसगाव चौफुली येथे गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित रिक्षात घरातील काही साहित्यांसोबत मृतदेह गादीत गुंडाळून रिक्षातून गावाकडे नेला जात होता. मात्र हा प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी रिक्षा अडवून तपासणी केली असता तरुणीचा मृतदेह आढळून आला.

advertisement

प्राथमिक चौकशीत सावत्र आईने, “मुलीचे प्रेमसंबंध होते. त्यातून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. आम्ही अंत्यसंस्कारासाठी मृतदेह गावाकडे नेत होतो,” अशी माहिती दिल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सावत्र आई-वडिलांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद केली असून सखोल तपास सुरू केला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सेंद्रिय भाजीपाला- फळे खरेदी करताय? खरा कसा ओळखायचा? सोप्या टिप्सचा Video
सर्व पहा

पोलिसांनी सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीती आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पोलिसांनी रिक्षा अडवली, आत पाहताच उडाला थरकाप, सावत्र आई-वडिलांच्या कृत्याने संभाजीनगर हादरलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल