सर्व महाराष्ट्रभरातून त्यांच्यावर टीकेचे आसूड ओढले गेले. त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केली होती. त्याउपर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही लगोलग राजीनामा द्या, असा स्पष्ट दट्ट्या दिल्यानंतर स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचे चाकणकर यांनी सांगितले. भोंदूबाबा अशोक खरात याच्यासोबत चाकणकर यांचे काही आर्थिक व्यवहार आहेत का? अशी चर्चा त्यांच्या राजीनाम्यानंतर सुरू झाली आहे. यासंदर्भाने मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आले.
advertisement
चाकणकरांसंदर्भात काही पुरावे मिळाले आहेत का?
रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला आहे, त्यांच्याबाबत प्राथमिकदृष्ट्या काही पुरावे मिळाले आहेत का? असे फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. महिलांसोबत दुर्व्यवहार करणाऱ्या व्यक्तींसोबत त्यांचे जवळचे संबंध होते. तसेच चाकणकरांनी त्यांना गुरूस्थानी मानले होते. अशा परिस्थितीत त्या जर अध्यक्षा म्हणून कायम राहिल्या तर महिलांना न्याय मिळणार नाही, त्यांनी हे मान्य केले. त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला, असे फडणवीस यांनी सांगितले.
कोण कोण तिकडे गेले, काय काय केले? खरात प्रकरणातले सगळ्यात जास्त पुरावे माझ्याकडे-फडणवीस
अशोक खरात प्रकरणात दोषी असलेल्या कोणत्याही व्यक्तींना कुठल्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. काही जण या सगळ्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोणाजवळ काही पुरावे असतील तर ते आणून द्यावेत, कारवाई केली जाईल. परंतु, विनाकारण या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले. यासंदर्भातले सगळ्यात जास्त पुरावे माझ्याकडे आहेत. कोण कोण गेले होते, कसे कसे प्रकार सुरू होते, हे मला पुराव्यातून कळाले आहे. अर्थात हे पोलिसांचे काम आहे. पोलीस महासंचालकांना मी स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत या पूर्ण चौकशीवर जातीने लक्ष ठेवून राहा. पोलीस महासंचालक, नाशिकचे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक तसेच महासंचालक या संपूर्ण प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींना गजाआड करतील, असे फडणवीस यांनी सांगितले.
पीडितांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचे प्रयत्न सुरू
ज्या महिलांसोबत त्याने दूरव्यवहार केला आहे त्यांना आम्हाला न्याय द्याययचा आहे. पीडित महिला लगोलग समोर येत नाहीत. लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे महिला पुढे येत नाहीत. या प्रकरणात पीडितांना धीर देऊन त्याच्या घरच्यांना धीर देऊन पुढे आणले जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
