TRENDING:

महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलसाठी रांगा, इंधनाची खरी परिस्थिती काय? CM फडणवीस स्पष्टच म्हणाले

Last Updated:

युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन महागण्याच्या आणि तुटवड्याच्या बातम्या समाज माध्यमांवर पसरल्या. यामुळे राज्यातील महत्त्वांच्या शहरांसह ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर : इराण इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलचा तुटवडा असल्याच्या अफवेमुळे महाराष्ट्रासह देशभरातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून स्थानिक जिल्हा प्रशासनाने दुचाकींना २०० रुपये तर चाकचाकींना २००० हजारांचे डिझेल देण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंधनाची सद्यस्थिती सांगितली.
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
advertisement

अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन महागण्याच्या आणि तुटवड्याच्या बातम्या समाज माध्यमांवर पसरल्या. यामुळे राज्यातील महत्त्वांच्या शहरांसह ग्रामीण भागातील

पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मात्र राज्याकडे आवश्यक साठा उपलब्ध असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

इंधनाची खरी परिस्थिती काय? CM फडणवीस स्पष्टच म्हणाले...

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व लोकांना विनंती करतो की केंद्र सरकारने वारंवार पुरेसे पेट्रोल डिझेल असल्याचे सांगितले आहे. तरी सुद्धा अनेक शहरांमध्ये विनाकारण लोक रांगा लावून अधिकचे पेट्रोल भरून घेत आहे. अशा प्रवृत्तीमुळे टंचाई निर्माण होते. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यावर ताण येतो. त्यावेळेस अनेक अडचणी निर्माण होतात. दर महिन्याला पेट्रोल डिझेलचा जेवढा पुरवठा हवा आहे, तेवढा उपलब्ध आहे. त्यामुळे कोणीही रांगा लावू नये. अशा काळात पेट्रोल पंपावर काळाबाजार कुणी करत असेल तर त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करू, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

advertisement

घाबरून जाऊन पेट्रोल-डिझेल भरण्याची गरज नाही

देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असून सर्व रिफायनरी १०० टक्के क्षमतेने सुरू आहेत. घाबरून जाऊन पेट्रोल-डिझेल भरण्याची काही एक आवश्यकता नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

इंधनाचा तुटवडा नसून मागणी वाढल्याचा परिणाम

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तब्बल 6 वर्षांची प्रतीक्षा, मराठी चित्रपटसृष्टीसाठी हक्काचं थिएटर, भारत माता सिनेमा पुन्हा सुरू, Video
सर्व पहा

गर्दीमुळे काही पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याने साठा शिल्लक नसल्याचे फलक लावण्यात आले होते. परंतु हा इंधनाचा तुटवडा नसून, अचानक वाढलेल्या मागणीमुळे झालेला परिणाम असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलसाठी रांगा, इंधनाची खरी परिस्थिती काय? CM फडणवीस स्पष्टच म्हणाले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल