TRENDING:

महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची खुर्ची लगेच सोडा, राजीनामा द्या, CM फडणवीसांचे चाकणकरांना आदेश

Last Updated:

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना वर्षा बंगल्यावर बोलावून त्यांच्याशी नाशिक भोंदूबाबा प्रकरणावर चर्चा केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्याशी असलेल्या सलगीमुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवरून पायउतार व्हावे लागणार असल्याची चिन्हे आहेत. नाशिक भोंदूबाबा प्रकरणात आपले म्हणणे मांडण्यासाठी गेलेल्या रुपाली चाकणकर यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगोलग राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस-रुपाली चाकणकर
देवेंद्र फडणवीस-रुपाली चाकणकर
advertisement

स्वत:ला ज्योतिषशास्त्रातला तज्ज्ञ म्हणवून घेणारा नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन याच्या गोरखधंद्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून त्याच्याशी जवळीक असलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर कारवाईची टांगती तलवार होती. खरात याच्या मंदिर देवस्थान ट्रस्टवर सदस्या असलेल्या चाकणकरांचे खरातसोबतचे अनेक फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होत असून त्यामुळे त्यांची चांगलीच अडचण झाली आहे. महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात खरातची चौकशी सुरू असल्याने रुपाली चाकणकर यांच्याकडे महिला आयोगाचे अध्यक्षपद ठेवू नये, त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कठोर पाऊल उचलून चाकणकर यांना राजीनाम्याचे आदेश दिल्याचे कळते.

advertisement

चाकणकर यांनी म्हणणे मांडले, पण CM म्हणाले, तुम्ही तत्काळ राजीनामा द्या

रुपाली चाकणकर यांना मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बोलावून त्यांच्याशी नाशिक भोंदूबाबा प्रकरणावर चर्चा केली. रुपाली चाकणकरांनी शुक्रवारी सहा वाजताच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत नाशिक प्रकरणावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. त्यानंतर आपण तत्काळ राजीनामा द्यावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिल्याचे कळते.

advertisement

तटकरे यांच्याकडूनही कारवाईचे संकेत

दुसरीकडे नाशिक प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाच्या दृष्टीने काय पावलं उचलायला हवीत ती आम्ही उचलू, असे सूचकपणे सांगत रुपाली चाकणकर यांची हकालपट्टी होऊ शकते, असे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अप्रत्यक्षपणे दिले होते.

रूपाली चाकणकर यांची अपमानास्पद एक्झिट

-महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पहिली नियुक्ती 21 ऑक्टोबर 2021 रोजी झाली होती

advertisement

-त्यानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच राज्य सरकारने त्यांची पुन्हा सलग दुसऱ्यांदा याच पदावर नियुक्ती केली

-राज्य सरकारने 15 ऑक्टोबर 2024 रोजी याबाबतची अधिसूचना जारी केली होती

-ही नियुक्ती 3 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली होती

-पहिल्यांदा त्यांची निवड महाविकास आघाडी सरकारच्या काळात

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रस्त्यावर पैसे मागितले, पण शेवटी ठरवलं अन् ट्रान्सजेंडर मनस्वीनं करून दाखवलं, VIDEO
सर्व पहा

-तर दुसऱ्या टर्मसाठीची नियुक्ती महायुती सरकारने केली

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची खुर्ची लगेच सोडा, राजीनामा द्या, CM फडणवीसांचे चाकणकरांना आदेश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल