चाळीच्या आजूबाजूला कोणतीही पार्किंगची सुविधा नाही. चाळीचे लोक इमारतीमध्ये गेले, पण त्यांना दुचाकीसाठी पार्किंग द्यावी, अशी मागणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली. चलानचे एसएमएस देखील उशीर येत असल्याचा मुद्या त्यांनी उपस्थित केला. वाहतूक पोलीस आणि वाहनधारकांमध्ये वादावादी होते, त्यातून भांडण होत असल्याचे दिसून येते याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, गोव्यात जसे बॉडी कॅमेरे आहेत तशी यंत्रणा महाराष्ट्रात आणण्याचा विचार आहे. टप्याटप्याने बॉडी कॅमेरे आणण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
advertisement
तर, मोठं बांधकाम करत असताना दुचाकीसाठी पार्किंग दिली जात नाही. बीडीडीसाठी देखील आधी पार्किंग देण्यात आली नव्हती. ती नंतर दिली गेली. आता दुचाकी पार्किंग करण्यात यावी यासाठी नगरविकास खात्याकडून आदेश दिले जातील, अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली.
चलान भरणाऱ्यांना इंधन नाही?
नियम मोडणे आणि इतर बाबींवरून वाहन चालकांना दंड ठोठावला जातो. मात्र, हा दंड भरला जात नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. सभागृहात सदस्यांनी हा मुद्दाही उपस्थित केला. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी म्हटले की, अनेक राज्यात चलान संदर्भात विविध नियम आहेत. ज्या मशीन दिले जाणार आहेत ते फास्टटॅगशी कनेक्ट करता येईल का? चलान भरले जात नाहीत, याकडे लक्ष वेधले. तर, चलान भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना पेट्रोल देऊ नये, अशी मागणी शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी केली.
यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल, चलान संदर्भात येत्या तीन महिन्यात योग्य ती नियमावली तयार केली जाईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली.
