TRENDING:

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचं अपडेट, नव्याने पात्र बहिणींना कधी मिळणार लाभ?

Last Updated:

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी नव्याने पात्र महिलांना अर्ज करण्याबाबत महत्त्वाचं अपडेट आलंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 होती. मात्र, त्यानंतर अनेक महिलांनी वयाची 21 वर्षे पूर्ण केली असून त्या देखील या योजनेसाठी पात्र ठरत आहेत. तसेच तांत्रिक कारणांनी राज्यातील 13 लाखांहून अधिक महिलांचे अर्ज बाद ठरले. त्यांना देखील पुन्हा अर्ज करायचे आहेत. यासाठी अर्ज नोंदणी कशी करायची? असा सवाल महिलांकडून उपस्थित होतोय.
Ladki Bahin Yojana: नव्याने पात्र लाडक्या बहिणींना कधी मिळणार लाभ? महत्त्वाची अपडेट
Ladki Bahin Yojana: नव्याने पात्र लाडक्या बहिणींना कधी मिळणार लाभ? महत्त्वाची अपडेट
advertisement

13 लाखांहून अधिक महिला अपात्र

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजनेची महायुती सरकारने 28 जून 2024 रोजी घोषणा केली. त्यासाठी 1 जुलै ते 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. या काळात सुमारे अडीच कोटी महिलांनी अर्ज केले होते. त्यांना या योजनेद्वारे आर्थिक मदत देखील मिळाली. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास 13 लाखांहून अधिक महिला या योजनेतून अपात्र ठरवण्यात आल्या. अपात्र महिलांना सुमारे 900 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला असून अपात्र लाभार्थ्यांचा डेटा प्राप्तिकर विभागाकडून गोळा केला जातोय.

advertisement

Gold Price : तुमच्याकडे 1 तोळं सोनं असेल तर तुम्ही होणार लखपती, सोन्याच्या दराची मोठी अपडेट

महिला गटांबाबत स्पष्टता नाही

लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा वापर सामूहिक उन्नतीसाठी करणाऱ्या महिला गटांना प्रोत्साहन देण्यात येईल. तसेच त्यासाठी विशेष योजना आखण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र, ही योजना नेमकी काय असेल व ती कधीपासून अमलात येईल, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

advertisement

तरच नव्या महिलांना संधी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाराष्ट्रातील असं मंदिर, जिथं 90 वर्षांपासून सुरू आहे अखंड दिवा, इतिहास तुम्हाला माहितीये का?
सर्व पहा

नव्याने पात्र झालेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. राज्य मंत्रिमंडलाने याबाबत निर्णय घेतल्यानंतरच नव्याने पात्र महिला अर्ज करू शकतील. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही हालचाल नाही. “मूळ शासन निर्णयात जी मुदत होती, त्याची अंमलबजावणी आम्ही केली. अर्ज पुन्हा सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळच निर्णय घेईल,” असे महिला व बालकल्याणंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचं अपडेट, नव्याने पात्र बहिणींना कधी मिळणार लाभ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल