अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करणार आहे. यामध्ये अजित पवार गटाला समर्थन देणारे विधानसभा आणि विधान परिषद आमदाराचे अॅफ्टीटयूट असल्याचे समजते. तर शरद पवार हे निवडणुकीद्वारे अध्यक्ष झालेले नाही अशीही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे दिली जाणार आहेत.
अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष पदावर निवडी संदर्भात निवडणूक प्रक्रिया कशी पू्र्ण केली यांचे कागदपत्र सादर करणार आहेत. अजित पवार, प्रफुल पटेल आणि तटकरे यांची निवड प्रक्रिया कशी झाली याची माहिती देण्यात येईल. याशिवाय अजित पवार गटाला समर्थन देणारे एनसीपी पक्षाची आमदार संख्या सर्वाधिक असल्याची कागदपत्रेही निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात येणार आहेत.
advertisement
Nashik : नाशिक रुग्णालयात पोहोचल्या केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, परिस्थिती पाहून बसला धक्का
शरद पवार यांच्या वतीने निवडणूक आयोगात अँड अभिषेक मनू सिंघवी बाजू मांडणार आहेत. अजित पवार गटाने सादर केलेल्या अँफिडीव्हेटमध्ये सरकारी कर्मचारी आणि मृत व्यक्तीच्या प्रमाणपत्रांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. अजित पवारांच्या अँफिडीव्हेटमध्ये ६० सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असून ९८ जणाचे अँफिडीव्हेट शिक्षण संस्थेचे कर्मचारी आहेत. शरद पवार गटाकडून ९ हजार शपथ पत्र देण्यात आली तर अजित पवार गटाने ५ हजार शपथपत्रे सादर केली असल्याची माहिती समजते.
शरद पवार गटांची अँफिडीव्हेट अजित पवार गटापेक्षा ४ हजार जास्त असल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडण्यासाठी १० जणांनी अर्ज दाखल केला आहे. यात पहिले नाव छगन भुजबळ दुसर नाव अजित पवार तिसर प्रफुल्ल पटेल ,धनंजय मुंडे यांचं नाव आहेत. अजित पवार यांच्या अध्यक्ष पदाच्या निवडीवरच उद्या आक्षेप घेतला जाणार असून अजित पवारांची निवड घटनेला धरून नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विस्तारित कार्य समितीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्तारित कार्य समितीची बैठक राजधानी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये होत आहे. यामध्ये सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष सहभागी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जर पक्ष चिन्ह गोठवलं तर पक्षाची काय रणनीती असावी यावर आजच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सोबतच ईशान्य कडील राज्यांमध्ये पक्षांतर्गत निवडणुका घेण्यासंदर्भात आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.
